⁠
Inspirational

आई-वडिलांची इच्छा केली पूर्ण; शुभमची MPSC परीक्षेत चौदाव्या क्रमांकावर बाजी !

MPSC Success Story : सर्वसामान्य घरातून आलेल्या शुभमची ही कथा अनेकांसाठी प्रेरणादायी प्रवास आहे.‌ शुभम दादाराव वाठोरे हा धनेगाव पंकजनगर येथील रहिवासी आहे. त्याचे मूळ गाव घोड्याचे कामठा (जि. हिंगोली) येथे आहे.त्याची आई प्राथमिक शिक्षिका आहे तर वडील खासगी नोकरी करतात. त्याचे प्राथमिक शिक्षण पंकज नगर येथील शाळेत झाले.

त्यानंतर दहावी पीपल्स हायस्कूलमध्ये तर बारावीचे शिक्षण यशवंत महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्याने आयआयटी कानपूर येथून इंजिनिअरींगची पदवी मिळवली.दहावी, बारावीत चांगले गुण मिळवून कानपूर येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला आणि अभियंता झाला. त्यानंतर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरू केला. नांदेडला घरीच राहून त्याने अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे शुभमने कुठलीच खासगी शिकवणी लावली नाही. राज्यसेवा आयोगाच्या वतीने २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत त्याने पहिल्याच प्रयत्नात चौदावा क्रमांक मिळवला. पहिल्याच प्रयत्नात तो राज्य सेवा आयोगाच्या परिक्षेत चौदावा आला आहे. त्याची निवड पोलीस उपअधिक्षक किंवा तहसीलदार म्हणून झाली आहे. लहानपणापासूनच स्वप्न साकार होण्यासाठी धडपड यशस्वी झाली.

Related Articles

Back to top button