---Advertisement---

MPSC Success Story : ‘तू अधिकारी व्हय..’ अन् मुलीने केले आईचे स्वप्न साकार..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Success Story : प्रत्येक पालकांना मुलांच्या भविष्याची चिंता असते. मुलांनी चांगलं शिक्षण घेऊन मोठं अधिकारी बनावे, अशी अपेक्षा आई वडिलांना असतेच. मुलांच्या शिक्षणासाठी आईवडील देखील मोठे आव्हान पेलतात. यातच मुलं-मुली देखील अहोरात्र मेहनत घेत असतात. दरम्यान, जिद्द, चिकाटी आणि प्रमाणिकपणाच्या जोरावर एका रिक्षाचालकाच्या मुलीने MPSC परीक्षेत बाजी मारली आहे. अधिकारी होण्याची इच्छा व्यक्त केलेल्या मुलीने देखील आईचे स्वप्न साकार केलं आहे.

अमरधाम रोड येथील सामान्य कुटुंबात जन्मलेल्या स्नेहा चंद्रकांत घटमाळे हिने ‘आरटीओ’ ऑफिसर बनून अशक्य असं काहीच नसल्याचं दाखवून दिलं आहे. शासकीय अधिकारी व्हायचे, असे ध्येय मनाशी बाळगून स्नेहा घटमाळे हिने तिच्या आयुष्याची सुरवात केली.

मनाचा ठाम निश्चय जिद्द आणि चिकाटी ठेवली तर कुठलीही गोष्ट शक्य होऊ शकते. स्नेहा अधिकारी बनावी अशी इच्छा तिच्या आईने व्यक्त केली होती. त्यानुसार अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याअनुषंगाने स्नेहा चंद्रकांत घटमाळे हिने १५ मार्च २०२० ला आरटीओ अधिकाऱ्याची पूर्व परीक्षा दिली. एका वर्षात नोकरी सोडून मुख्य परीक्षेसाठी तिने सराव सुरू केला. २० नोव्हेंबर २०२१ ला सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाची मुख्य परीक्षा दिली. यात स्नेहा एनटीबी महिला आरक्षण वर्गात पहिल्याच प्रयत्नात राज्यात द्वितीय क्रमांक पटकावीत सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक होण्याचा मान मिळविला. 

स्नेहा हिने सारडा कन्या शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊन पुढील शिक्षण के. के. वाघ महाविद्यालयात घेत २०२० मध्ये अभियांत्रिकी आणि डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले. २०२० ते २०२१ असे एक वर्ष तिने एका कंपनीत नोकरी केली.

आईचे स्वप्न केले साकार
अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना आवश्यक असलेले पुस्तक खरेदी करण्यासाठी आईसह बाजारात गेली असता, पुस्तकाच्या दुकानात आरटीओ अधिकारी परीक्षेसाठी आवश्यक असलेले पुस्तक आईच्या नजरेस पडले. त्यावरील वर्दीतील छायाचित्र आईला आकर्षित करून गेले. आईने स्नेहाकडे अशाच प्रकारे अधिकारी होण्याची इच्छा व्यक्त केली. तिने जिद्द पकडत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेत यश प्राप्त करून आईचे स्वप्न साकार केले. दरम्यान, स्नेहा हिने आई- वडील, भाऊ, बहीण यांचा माझ्या यशामध्ये मोठा वाटा राहिला असल्याची प्रतिक्रिया तिने दिली.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts