MPSC Success Story : आपली चिकाटी आणि जिद्द ही अनेक गोष्टींसाठी बळ देते. तृप्ती ही मूळची बागलाण तालुक्यातील डोंगरेज येथील रहिवासी. तिच्या घरी शैक्षणिक वातावरण होतेच. त्यामुळे तिला अभ्यास करायला अधिक चालना मिळाली.तृप्तीचे वडील प्रा. डॉ. संभाजी खैरनार हे नामपूर महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. तर आई गृहिणी आहे.
तृप्तीचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण नाशिकच्या मराठा हायस्कूलमध्ये झाले. अकरावी, बारावी तसेच इंजिनिअर कॉलेज के. के. वाघ कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. गेल्यावर्षी तृप्तीने महाराष्ट्र लोकसेवा परीक्षा देऊन उपअधीक्षक भूमी अभिलेख यात यश मिळवून सध्या ती संभाजीनगर येथे प्रशिक्षण पूर्ण करीत आहे. परत तिने परीक्षा दिली. जिद्द, चिकाटी मनाशी बाळगल्यास यश हमखास मिळते.
तिला या यशस्वी प्रवासात केरसाणे गावाची उपजिल्हाधिकारी पूनम आहिरे हिचे व सहाय्यक राज्य कर आयुक्त निरंजन कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कुटुंबाची साथ आणि इतर मार्गदर्शन यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षेचे ध्येय मनाशी बाळगून तहसीलदार होण्याचे स्वप्न तिने पूर्ण केले.२०२२ मध्ये दिलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तहसिलदार पदाच्या परीक्षेत यश मिळवून गावाचे नाव मोठे केले.