---Advertisement---

आर्थिक परिस्थितीशी संघर्ष वैष्णवी झाली उपजिल्हाधिकारी !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : आज स्पर्धा परीक्षेची अनेक विद्यार्थी तयारी करतात. हे करत असताना काहींना यश तर काही नाही येत नाही. मात्र अपयशाने खचून न जाता प्रयत्न करत राहणे हा एक यशाचा मार्ग आहे. एमपीएससी ही साधारण परीक्षा नाही, यासाठी सातत्य ठेवून प्रत्येक परीक्षेपासून नवीन शिकत जाणे आवश्यक आहे. वैष्णवी हरिभाऊ बावस्कर ही नागपूरची लेक. वैष्णवी बावस्कर सध्या मंत्रालयातील गृह विभागात सहाय्यक कक्ष अधिकारी आहे. आता तिची निवड उपजिल्हाधिकारी म्हणून झाली आहे

वैष्णवीने अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून कठोर परिश्रम घेतले. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारली. हा तिचा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता. काही वर्षांपूर्वी २०१९ मध्ये तिच्या वडिलांचे छत्र हरवले. आई एका खासगी रुग्णालयात कामाला होती. आर्थिक परिस्थिती चणचण भासू लागली. तिने ठरवले की आपण देखील करून दाखवायचे.वैष्णवीने शासकीय विज्ञान महाविद्यालयातील फॉरेन्सिक सायन्समधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सुरूवातीला संयुक्त परीक्षेत यश मिळवले.

वैष्णवी बावस्करची सहा महिन्यांपूर्वीच मंत्रालयातील गृह विभागात सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर निवड झाली. तिने परीक्षेची तयारी करताना राज्यसेवेसोबत दुसऱ्या परीक्षांच्या अभ्यासाची तयारी ठेवली. आपल्या चुकांमधून शिकत जाऊन आपण पुढच्या परीक्षेसाठी अधिक तत्परतेने तयार झाली. चार वेळा परीक्षा आणि दोन वेळा मुलाखतीही दिल्या.राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ साठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली. त्यानंतर वैष्णवीला उपजिल्हाधिकारी पदापर्यंत यश मिळवता आले.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts