MPSC Success Story : लहानपणापासून अभ्यासाची गोडी, नववी – दहावीपासून ठरवलं की बनायचे तर अधिकारी… अभ्यास कसा करायचा? हेच माहिती नसतानाही देखील हळूहळू शिकत सातारातील नांदल गावातील मुलगी ज्योती हिंदुराव कांबळे ही राज्यसेवा मुख्य परीक्षेत यश मिळवले आहे.
तिचे प्राथमिक शिक्षण नांदल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे झाले आहे. माध्यमिक शिक्षणही नांदल येथेच पूर्ण झाले आहे. उच्च माध्यमिक शिक्षण घेत असताना समाजासाठी प्रशासनाची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे कळायला लागले.तिने पुण्यातील कृषी महाविद्यालयातून बीएससी एग्रीकल्चर पदवी पूर्ण केली. याआधी तिची आरएफओ म्हणून २०१९ साली निवड झाली होती. २०२० च्या राज्यसेवेत ती नायब तहसिलदार झाली. सध्या ती उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत.
तिची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची, वडील दहावी नापास, शेतीत कमी उत्पन्न पण चांगला अभ्यास केला तर चांगली नोकरी लागते.हे यशाचे गमक ओळखले होते. तिने वेळेचे नियोजन करून अभ्यासाचा आराखडा तयार केला.
आता उपजिल्हाधिकारी झाल्यावर ग्रामीण भागाच्या समस्यांवर प्रशासनासाठी महत्त्वाच्या रोल आहे. प्रशासनाच्या माध्यमातून खूप काही करू शकतो. स्वतः प्रतिनिधित्व करून या माध्यमातून कुठेतरी व्यापक स्तरावर काम करता येईल. यासाठी ती काम करत राहणार आहे.