MPSC Success Story : ग्रामीण भागातील मुलांना ‘पोलिस’ या पदाचे विशेष आकर्षण असते. तसेच केदारच्याही उराशी सोपे होते. ते स्वप्न करण्यासाठी जिद्दीने केदारने अभ्यास करून हे यश मिळवले आहे.
केदार बारबोले यांचे गाव जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील मारफळ हे आहे. एका पत्र्याच्या घरात लहानाचा मोठा झालेल्या केदारला या प्रवासात अनेक अडचणी आल्या. वडिलांच्या अकाली निधनानंतर दु:खाचा मोठा डोंगर त्यांच्या अंगावर कोसळला. अभ्यास मात्र सोडला नाही.
केदार म्हणतो की, “स्व: प्रेरणा आणि चांगला मार्गदर्शक हे माझ्या यशाचे गमक आहे. आयोग हेच सर्वात मोठे मार्गदर्शक आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आधीच्या वर्षांतील प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम महत्त्वाच्या आहे. सोशल मीडियापासून दूर राहिल्यावर अधिक अभ्यास होतो.
हे उमगल्यामुळे काही काळ यापासून दूर राहिलो. कालचा मी आणि आजचा मी यात फरक समजून घेतला. यात फक्त वाचन करून चालणार नाही तर चर्चा सत्र, गट चर्चा देखील आवश्यक आहेत.पद, पैसा आणि प्रतिष्ठा यापलिकडे जावून पदाचा लोकांच्या कल्याणासाठी वापर करणे ही गरज आहे.यासाठी प्रामाणिकपणे पदाचा वापर करेन”.
यामुळेच केदारला राज्यसेवा परीक्षेत सलग दुसऱ्यांदा त्यांनी यश मिळवलंय.त्यांनी यापूर्वी २०२० साली पहिल्याच प्रयत्नात सहाय्यक निबंधक म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले होते. त्यानंतर २०२१ साली झालेल्या एमपीएससी परीक्षेत सलग दुसऱ्यांदा यश मिळाले असून यंदा राज्यातून सहावा क्रमांक पटकावला आहे.