---Advertisement---

सात ते आठवेळा अपयश, तरी जिद्द सोडली नाही, अखेर MPSC परीक्षेत मारली बाजी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : नाशिक जिल्ह्यातील देवळा येथे प्रजापत कुटूंब केटरर्स व्यवसाय करतात. त्यांच्या या व्यवसायाला किरणची देखील बरीच मदत होते. ती दिवसभर कुटूंबियांना घरकामात मदत करायची आणि यातून वेळ काढून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायची. इतकेच नाहीतर तर मधल्या काळात विवाहात मेंदी काढणे, त्यांना सजवणे, लहान मुलांच्या ट्युशन घेणे अशी कामे करत घरखर्च भागवण्यास मदत केली.

घरात कोणतेही शैक्षणिक वातावरण नसतानाही स्व-मेहनतीने यशाची पायरी चढाली आहे. ती एमपीएससीच्या ‘कर सहाय्यक’ पदाच्या परीक्षेत ती मुलींमध्ये १९ वी, तर महसूल सहाय्यक-मंत्रालय लिपिक पदासाठी ओबीसी मुलींमध्ये राज्यात प्रथम आली. हे सहज शक्य होते का? तर अजिबात नाही. या परीक्षेत तिला सात ते आठवेळा अपयश पचवून जिद्दीने तिने एकाच वेळी दोन परीक्षेत यश मिळवले.

आपल्याला मनाशी पक्की जिद्द असेल तर आपण कोणतेही यश मिळवून दाखवू शकतो. हेच किरणने दाखवून दिले आहे.तिची आई अशिक्षित आणि वडिलांचे किरकोळ शिक्षण त्यात मातृभाषा राजस्थानी असूनही मराठी आणि इंग्रजीवर प्रभुत्व मिळवत सर्व टप्पे पार केले.

लहानपणापासून किरणला अभ्यासाची गोडी होती.दहावीला ८५ टक्के होते, तर बारावीला ८१ टक्के गुण होते. तिने आपला रस्ता स्वतःच तयार करण्यास सुरुवात केली. देवळा महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेत प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यास सुरुवात केली. महाविद्यालयीन शिक्षण घेताना ती दररोज नित्यनेमाने वर्तमानपत्रे व इतर पुस्तके वाचायची. तिला त्यांचा फायदा स्पर्धा परीक्षेची तयारी करताना झाला.

किरणने स्पर्धा परीक्षेचा देखील असाच नियमबद्ध अभ्यास केला. यात तिला मोठ्या भावाचे भरपूर सहकार्य लाभले. त्यामुळेच तिने ही प्रशासनाची पदे मिळवली आहेत.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts