आधी पोलिस आता पोलिस उपनिरीक्षक ; लक्ष्मीचा प्रेरणादायी प्रवास !
MPSC Success Story : आपली कष्ट करण्याची तयारी असेल आणि स्वतःला झोकून देऊन अभ्यास केला तर यश हे मिळतेच. याचेच एक उदाहरण म्हणजे लक्ष्मी चक्रनारायण होय. लक्ष्मी मच्छिंद्र चक्रनारायण या तरूणीची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. पोलिस ते पोलिस उपनिरीक्षक हा तिचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील जामठी बु. येथील रहिवासी लक्ष्मी चक्रनारायण ही तरूणी…तिची आई वेणूताई ही शेतकरी असून वडिलांचे २०१८ साली निधन झाले. मात्र, वडिलांच्या निधनाने खचून न जाता स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासात संयमासह सातत्य ठेवले. लक्ष्मीचे प्राथमिक शिक्षण हे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. यानंतर तिने माध्यम शिक्षण जवाहर विद्यालयातून पूर्ण केले. तसेच बारावी पर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेतून वसंतराव नाईक विद्यालय, मुर्तिजापूर येथे पुर्ण झाले. तर मुर्तिजापूर येथील डॉ. आर.जी. राठोड विद्यालयातून तिने विज्ञान शाखेतून पदवी संपादित केली. यानंतर लक्ष्मी ही स्पर्धा परिक्षेकडे वळली.
पीएसआयपदी निवड होण्यापुर्वी लक्ष्मीची मे २०२३ मध्ये पोलीस शिपाईपदी निवड झाली. यानिमित्ताने फेब्रुवारी महिन्यापासून तिचे सध्या अकोला येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण सुरू आहे.आतापर्यंतच्या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमुळे मला यशापासून दूर रहावे लागत होते. यानंतर आयोगाला काय नेमकं अपेक्षित आहे,
तिने सखोलपद्धतीने लक्ष देत अभ्यासात स्मार्ट स्टडी संकल्पनेचा वापर केला. त्यानंतर तिने पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर जुलै २०२२ मध्ये झालेली मुख्य परिक्षा उत्तीर्ण करत शारीरिक चाचणी व मुलाखतीत यश मिळवले. लक्ष्मीने पीएसआयच्या परीक्षेत मुलाखतीसह एकूण २१० मार्क्स मिळवत एससी महिला प्रवर्गातून राज्यातून सातवी रँक प्राप्त केली आणि पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.