⁠  ⁠

शेतकऱ्याची लेक खेळात आणि अभ्यासातही हुशार ; नीलम बनली राज्य विक्रीकर निरीक्षक

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Success Story : खरंतर, नीलमला खेळाची खूप आवड. पण शेतकरी कुटुंबात जडणघडण झाल्याने फक्त खेळात रमून चालणार नाही तर अभ्यास करायला हवा. ह्या विचाराने तिने निर्धार केला आणि ती यशस्वी झाली.नीलम सूर्यकांत वाघ ही मूळची आंबेगाव तालुक्यातील रांजणी या गावची लेक.नीलमचे वडील सूर्यकांत वाघ व आई रूपाली वाघ या शेती करत असून जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. नीलमला कोमल, मानसी या दोन बहिणी आहेत ‌.

नीलमचे प्राथमिक शिक्षण कारमळा येथे तर माध्यमिक शिक्षण नरसिंह विद्यालय रांजणी येथे झाले. नरसिंह विद्यालयाच्या मैदानावर इयत्ता पाचवी पासून तिने खो-खोचे धडे गिरवले. दहावी व बारावी परीक्षेत विद्यालयात प्रथम मिळवण्याची कामगिरी नीलमने केली होती.

महाविद्यालयीन शिक्षण रयत शिक्षण संस्थेचे एस एम जोशी महाविद्यालय हडपसर येथे शिक्षण घेताना एमपीएससीचाही अभ्यास सुरू केला.अत्यंत प्रामाणिकपणे कष्ट करून तिने १९ वर्षीय शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले असून राज्य पातळीवर विविध खो खो स्पर्धेत सुवर्ण, रौप्य, कांस्य पदके पटकावली आहेत. याचा तिला एमपीएससीच्या प्रक्रियेसाठी फायदा झाला. तिने खेळाडू कोट्यातून महिला गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्य विक्रीकर निरीक्षक पदी (STI) निवड झाली आहे.

Share This Article