शेतकरी कन्येची पोलीस उपनिरक्षक पदी गगनभरारी !

Published On: जुलै 22, 2024
Follow Us

MPSC Success Story : शेतकऱ्याची लेक मेहनत करून यश मिळवते. हे अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी बाब आहे.जालना जिल्ह्यातल्या हिवर्डी या छोट्याश्या गावातली पूजा भूतेकर. सामान्य शेतकरी कुटुंबात पूजाची जडणघडण झाली. घरची परिस्थिती साधारण असली तरी कुटुंबीयांनी शिक्षणाला नेहमीच महत्त्व दिलं. त्यांनी पूजालाही तिचं करिअर निवडण्यास पूर्ण स्वातंत्र्य दिलं. पूजानं प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केलं. त्यानंतर बारावीपर्यंतचं शिक्षण नवोदय विद्यालय आंबामध्ये झाले.

पुढे तिने पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरुवातीला क्लास लावून त्यांनी एमपीएससीचा अभ्यास केला. त्यानंतर आणखी चांगली तयारी करण्यासाठी पुणे गाठलं. स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.तिच्या या यशात कुटुंबीयांचा खूप मोठा वाटा आहे. तिने फक्त अभ्यास एके अभ्यास केला नाहीतर मैदानी सराव देखील केला.

त्यामुळे पूजाच्या या कष्टाचं अखेर चीज झालंय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरक्षक पदाच्या परीक्षेच्या निकालात यश मिळाले. तिला पीएसआय परीक्षेत ३७२ वा रँक मिळवत यश मिळाला आहे.तिने मोठे स्वप्न बघितले कधीही परिस्थितीचा बाऊ करू नक सातत्याने प्रयत्न केले तर यश आपल्याला नक्कीच मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025