⁠  ⁠

जिद्दीला कष्टाची जोड ; पौर्णिमा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात आली पहिली !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Success Story : आजच्या घडीला अनेक विद्यार्थी आई वडिलांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी जीवाचं रान करत असतात. मात्र अनेकदा दोन तीन वर्ष होऊनही अपयश मिळते. पण अभ्यासातील सातत्य असेल तर यश नक्कीच मिळते. अशीच पौर्णिमा हिची देखील कहाणी आहे.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी हह्या गावची पौर्णिमा रहिवासी आहे.‌ तिचे प्राथमिक शिक्षण हे अहिवंतवाडीत झाले. त्यापुढे, सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण हे दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील नवोदय विद्यालयात झाले. राहुरी येथील कृषी विद्यापीठातून बीएस्सी कृषी क्षेत्रातील पदवी प्राप्त केली. पुढे गेट परीक्षेच्या माध्यमातून आयआयटी खरगपुर येथे कृषी क्षेत्रातून एमएस्सी पदवी प्राप्त केली.पौर्णिमाचे वडील विठोबा शिवराम गावित हे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पौर्णिमा स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून पालिका उपायुक्ताची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.

एकेदिवशी वडिलांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात गेली असताना अनेक अधिकारी पाहून वडिलांनी असच तुला व्हायचंय, ही प्रेरणा दिली. यानंतर तिने एमपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्याच प्रयत्नात ती उत्तीर्ण होत २०२० साली कक्ष अधिकारी म्हणून मंत्रालयात निवडही झाली. पण तिने ते नाकारुन पुढे परीक्षा सुरु ठेवल्या. त्यानुसार तिसऱ्या प्रयत्नात पौर्णिमाने यशाला गवसणी घालतमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात पहिली आली.

सध्या तिची महापालिका उपायुक्त पदी निवड झाली आहे. अनुसूचित जमाती मधील आदिवासी समाजातील मुलींसाठी तिने एक आदर्श निर्माण केला आहे.

Share This Article