MPSC Success Story : खरंतर अजूनही ग्रामीण भागात शिक्षणाचा आणि सोयी सुविधांचा अभाव दिसून येतो. पण शिक्षणाची कास धरली की मार्ग सापडतो. दुष्काळी तालुक्यामधील विद्यार्थ्यांचा ओढा अलीकडे स्पर्धा परीक्षाकडे वाढला आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. तसेच, प्रज्ञा दगडू फटे हिने शिक्षणाची कास धरली आणि एमपीएससीच्या परीक्षेत 527 गुण मिळवत मुलीमध्ये 39 वा क्रमांकाने यश संपादन केले.
तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फटेवाडी येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण दामाजी हायस्कूल येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण दामाजी महाविद्यालय येथे पूर्ण केले. अजून शिकून मोठे व्हायचे ही इच्छा उराशी बाळगून तिने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. फर्ग्युसन महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले.
अहोरात्र मेहनत घेतली आणि परीक्षेचे स्वरूप समजून घेतले. यात तिला यश मिळाले. तिने एमपीएससीच्या परीक्षेत ५२७ गुण मिळवत मुलीमध्ये ३९ वा क्रमांकाने यश संपादन केले.मंगळवेढ्यातील लेकीने करून दाखवले.