एमपीएससीच्या परीक्षेसाठी संयम आणि कष्ट महत्त्वाचे असते. त्यासाठी प्रत्येकजण आपल्या जीवाचे रान करतो. मात्र काहींना अथक प्रयत्न करूनही यश गवसत नाही. पण पट्ट्याने अतिशय खडतर परिस्थितीतून मार्ग काढत एमपीएससी यश मिळवले.
प्रमोद भास्कर सटाले हा परळी वैजनाथ तालुक्यातील तडोळी या गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मालेला लेक. त्याची घरची परिस्थिती सर्वसामान्य शेतकरी कुटुंबासारखीच होती. त्याचे प्राथमिक शिक्षण अर्थातच चौथीपर्यंतचे शिक्षण त्यांच्या गावातच घेतले. यानंतर माध्यमिक शिक्षण त्यांच्या गावात जवळील मांडखेलच्या आसूबाई विद्यालयात पूर्ण केले.
दहावीपर्यंतचे शिक्षण मांडखेलला पूर्ण केल्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी त्यांच्या मामाच्या गावी घेतले. त्यानंतर एमआयटी लातूर मधून बीबीए पूर्ण केले. बीबीए नंतर त्यांना लगेचच नोकरी करायची होती. मात्र उच्च शिक्षणाचीही आवड होती. त्यामुळे घरच्यांची समज घालत त्यांनी घरच्यांना उच्च शिक्षणासाठी राजी केले.प्रमोदचे अधिकारी होण्याचे स्वप्न होते. मात्र हे स्वप्न वाटत होते तेवढे सोपे नव्हते.
यासाठी प्रमोदला मोठी मेहनत घ्यावी लागली.सुरुवातीला यूपीएससीचा अभ्यास केला. जूनियर ऑडिटर म्हणून नोकरी केली. कालांतराने नोकरीचा राजीनामा दिला आणि २०१४-१५ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाचे ग्रुप बी ची राज्य विक्रीकर निरीक्षक (एसटीआय) परीक्षा उत्तीर्ण झाला. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या प्रमोदला मात्र काहीतरी मोठे करायचे होते.