जिद्द असेल तर यश नक्कीच मिळते ; शेतकऱ्याचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक!
MPSC Success Story : प्रशांत मधुकर ताकाटे हा लहानपणापासून अत्यंत सामान्य कुटुंबात लहानाचा मोठा झालेला…पण अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न त्याला सतावत होते. प्रशांतचे वडील हे रानवड येथे साखर कारखान्यात कामगार आहेत. त्यांची जेमतेम एक – दोन एकर शेती… संपूर्ण कुटुंब हे दुभत्या जनावरांवर आधारित उत्पन्नावर अवलंबून होते.
त्यामुळे, त्याचे प्राथमिक शिक्षण हे दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे झाले. २०१४-१५ मध्ये प्रशांतने पिंपळगाव बसवंत महाविद्यालयात बी. एसस्सीचे शिक्षण पूर्ण केले. परंतु, घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याने काही दिवस खेडगाव (ता. दिंडोरी) येथे चौथी-पाचवीच्या मुलांसाठी खासगी क्लास चालवले.
या काळात त्याच्या वडिलांनी आर्थिक मोबदल्यामुळे त्यांनी १९९४ ला साखर कामगार पदाचा राजीनामा दिला आणि थ्रेशर मशिनचा व्यवसाय सुरू केला.मग प्रशांतने खाजगी क्लासेस घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या परिक्षेत यशाला हुलकावणी देखील मिळाली. परंतू, प्रशांतने जिद्द सोडली नाही. २०२२ ला झालेल्या परिक्षेत त्याने अहोरात्र अभ्यास करून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.