---Advertisement---

शेतकऱ्याच्या लेकीची कमाल ; प्रियंका झाली एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : एमपीएससीमध्ये शेतकरी पोरांची झेप आता दिवसेंदिवस वाढत आहे. फक्त शेतकरी मुलगाच एमपीएससी सारखा खडतर प्रवास सर करू शकतो असे नाही तर मुली देखील एमपीएससीची परीक्षा पास होऊ शकतात याचेच एक उदाहरण म्हणजे प्रियंका घोरपडे.

शेतकऱ्याच्या मुलीने एमपीएससी परीक्षेत यश मिळवणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. चांदोरी गावातील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या प्रियंका घोरपडे यांनी एमपीएससी परीक्षेमध्ये यश मिळाले आहे.घरची परिस्थिती जेमतेम असतांना देखील तिच्या वडिलांनी तिच्या शिक्षणासाठी तिला नेहमीच प्रोत्साहित केले.

प्रियांकाचे शालेय शिक्षण हे कन्या विद्या मंदिर येथे घेतले. माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेत घेतले आणि नंतर के.के.वाघ मधून इंजिनिअर पदवी घेतली. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. प्रियंकाचा हा प्रवास काही सोपा नव्हता. तिने अनेक चढ-उतार अनुभवले आणि यातूनच तिला एमपीएससीसारखी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रेरणा मिळाली. या मेहनतीला यश मिळाले…२०१९ मध्ये ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षामध्ये यशस्वी झाली.या परीक्षेमार्फत तिची सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता या पदावर निवड झाली. तिच्या या प्रवासात कुटुंबाची साथ महत्त्वाची आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts