---Advertisement---

मजूराची मुलगी झाली पोलिस उपनिरीक्षक; प्रियंका ठरली गावचा अभिमान !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : एखाद्या गावातील मुलगी उच्च शिक्षण घेऊन गगनभरारी घेते. तेव्हा सगळ्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट असते. अशीच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव भागातील प्रियंका काळे. तिचे वडील हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मजुरीचे काम करतात. त्यामुळे संपूर्ण कुटुंब हे यावर अवलंबून होते. अशाही परिस्थितीत प्रियांकाने शिक्षणासाठी मेहनत घेतली. गावातून प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर शहराची वाट धरली.

इतकेच नाही तर प्रियंका काळे ही नावाजलेली कबड्डी खेळाडू असून तिने जिल्हा , राज्य व केंद्र स्तरावर अनेक पदके मिळवली आहेत. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.

तिची खेळाडूवृत्ती असल्याने तिला अधिकच वर्दीचे आकर्षण होते. त्यामुळे तिने याला अभ्यासाची सोबत दिली.प्रियंकाने वडिलांचे आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि चिकाटीने अभ्यास केला. तिच्या या परिश्रमाचे चीज झाले. प्रियंकाची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.खामगाव शहराचे नाव लौकिक या स्पर्धेतून केलेले आहे.यशाला गवसणी घालणाऱ्या या सर्वसामान्य कुटूंबातील लेकिची गावात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts