⁠  ⁠

पोरीने केली कलाम ; सलग दोनदा MPSC परीक्षेत मिळविले घवघवीत यश !

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC Success Story स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आपण अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित केले….त्याला त्याला सातत्य, संयमाची जोड असेल तर यश मिळतेच. ह्या परीक्षेचा अभ्यास करताना मन विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणे आवश्यक आहे.‌ तसेच योग्य मार्गदशनाचीही आवश्यकता असून आपले हित जपणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. असाच प्रियांका मिसाळ हिचा प्रेरणादायी प्रवास आहे.

प्रियंका भास्कर मिसाळ ही मुळची बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील खोकरमोहा या गावची रहिवासी आहे. तिची आई जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षिका असून वडील मुख्याध्यापक आहेत. त्यामुळे लहानपणापासून घरामधून शिक्षणाची वाट दाखवली गेली आणि प्रोत्साहन दिले गेले. प्रियंकाचे शिक्षण दहावीपर्यंत बीडमध्ये तर बारावी औरंगाबादमध्ये पूर्ण झाली. तिने २००५ सालापासून नागपूरच्या डेन्टल कॉलेजमधून बीडीएसची पदवी घेतली. त्यानंतर तिने एमपीएससी करायचा निर्णय घेतला.

यासाठी तिने गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे आपण स्वत: विश्लेषण केले. कमीत कमी पुस्तक आणि जास्तीत जास्त सराव करण्यासाठी विविध प्रकारे उजळणी, घटकांच्या आधारित नोट्स काढल्या. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवणे यातून कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवणं शक्य आहे.

सुरूवातीला अपयश आले पण तिने अभ्यास चालू ठेवला. तिची २०१९ साली सहायक कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली तर ती महाराष्ट्र राज्यात प्रथम आली. जून २०१९ पासून ती मंत्रालयातील जलसंपदा विभागात सहायक कक्ष अधिकारी म्हणून रुजू झाली. त्यानंतरही तिने अभ्यास सुरुच ठेवला आणि राज्यसेवा परीक्षेतून तिने तहसीलदार या पदाला गवसणी घातली.

Share This Article