---Advertisement---

कठीण परिस्थितीचा सामना करत रंगकाम करणाऱ्याची लेक बनली उद्योग निरीक्षक!

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : कोणत्याही सुख सोयीचे वातावरण नसतानाही रूपाली तुकाराम कापसे हिने बारावी पासूनच स्पर्धा परीक्षेचे ध्येय निश्चित केले होते. रूपाली ही मूळची मुंबईची…चुनाभट्टी सारख्या परिसरामध्ये राहते. एका छोट्या चाळीत घर आहे. एका छोट्याशा घरात सारं कुटुंब एकत्रीपणे राहतं. तिने ग्रंथालयामध्ये अभ्यास केला ते ग्रंथालय देखील फक्त दहा बाय दहाच आहे.तिला सुद्धा काही आर्थिक अडचणी होत्या.

पण तिने‌ त्यावर ध्येयाने प्रेरित होऊन मात केली. तिची आई घरकाम करते तर वडील मजुरी करतात ते रंगकाम करतात.बारावीला असतानाच स्पर्धा परीक्षा देण्याचं नियोजन केलं होतं. तिने पदवीच्या शेवटच्या वर्षी अभ्यासाला सुरूवात केली. सुरुवातीला तिने कुणाचंही मार्गदर्शन नव्हतं. त्यातच दोन वर्ष कोरोना होता. पण आपला खर्च कसा भागवायचा…तर तिला बी.टेकला असताना स्टायपेंड मिळायचा. त्यावेळी त्या पैशांवर थोडफार भागत होतं. त्यानंतर ती राज्य महिला आयोगात एक उपक्रमावर ट्रेनी म्हणून रुजू झाली. तिथून तिला काही मानधन म्हणून थोडेफार पैसे मिळायला लागले.

या मिळणाऱ्या पैशावर ती आर्थिक खर्च भागवत असे…आर्थिक अडचणी प्रत्येकालाच असतात. मात्र, त्या अडचणींना आपण कवटाळून ठेवायचं की त्या अडचणींवर मात करून पुढे जायचं हे आपल्या हातात असतात. हे रूपालीने दाखवून दिलं. ती छोटेखानी नोकरी करत अभ्यासाचे नियोजन करत असे….१२-१५ तास अभ्यास करण्यापेक्षा कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास कसा होईल याकडेच लक्ष देत असे…उत्तम नियोजन आणि वेळापत्रक, सोबतीला मेहनत, जिद्द आणि चिकाटी यामुळेच तिला कष्टाचे फळ मिळाले आहे.महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीच्या परीक्षांचे निकालात तिची उद्योग निरीक्षक पदी निवड झाली आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts