---Advertisement---

जनसेवेचे स्वप्न उराशी बाळगत सायली बनली उपजिल्हाधिकारी!

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून खडतर अभ्यासाचा डोंगर पार करून सायली ठाकूरने मिळवलेल्या घवघवीत यश हे सगळ्यांसाठी सकारात्मक बाब आहे. इतकेच नाहीतर तर तिने एमपीएससी परीक्षेत ओबीसी महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. शासन सेवेत प्रथम वर्ग अधिकारी म्हणून तिची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद शाळेत शिकलेली विद्यार्थीनी जेव्हा उपजिल्हाधिकारी होते, हा एक प्रेरणादायी प्रवास आहे.
सायली शाम ठाकूर ही रायगड जिल्ह्यातील पनवेलमधील नेरे या भागाची रहिवासी आहे. तिचे पनवेल मधील नेरे येथे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. तर पुढे उच्च माध्यमिक शिक्षण सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या के.आ.बाठिंआ विद्यालयामध्ये पूर्ण केले. त्यानंतर तिने खालापूर जवळील शांतिनिकेतन तंत्रविज्ञान महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी प्राप्त केली.

पदवी परीक्षेनंतर कोणत्याही नोकरीचा विचार न करता…लोकांची सेवा करावी, समाजकार्याची आवड असल्याने व्यवस्थेत राहून समाजकार्य करावे या उद्देशाने तिने मात्र खाजगी कंपनीमध्ये सेवा करण्यापेक्षा प्रशासनामार्फत जनसेवा करावी म्हणून एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. यासाठी तिने कोणताही खाजगी क्लास लावला नाही. तर घरच्या घरी अभ्यास करून नोट्स काढून अभ्यासाची सतत उजळणी करत राहिली. यामुळे, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने सन २००० मध्ये घेतलेल्या परीक्षेतून राज्यातील ओबीसींच्या महिला प्रवर्गातून तिने राज्यात प्रथम क्रमांक पटकावून पनवेलसह संपूर्ण महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts