⁠  ⁠

संसाराचा गाडा सांभाळून सीमाने जिद्दीने मिळवले पोलीस उपनिरीक्षक पद !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Success Story : आपल्या घरचा पाठिंबा असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हेच सीमाने करून दाखवले आहे. अत्यंत खडतर परिश्रम करून व संसाराचा घर -गाडा सांभाळून तिने अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून हे यश संपादन केले आहे. सौ. सीमा अक्षय गायकवाड ही मूळची फलटण येथील रहिवासी.

तिचे प्राथमिक शिक्षण फलटण तालुक्यातील फरांदवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. पुढे उच्च शिक्षण फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी कॉलेज येथे झाले . तसेच त्यांचे डी. एड. हे फलटण येथील जाधववाडीच्या डायटच्या डी. एड. कॉलेज येथे झाले त्यांनी डी.एड. ही चांगल्या गुणांनी पूर्ण केले होते खरंतर तिला शिक्षक व्हायचे होते. पण भरती होत नसल्याने तिने आपला मार्ग बदलला आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. याच दरम्यान तिचे लग्न पण झाले. तिच्या पतीने व संपूर्ण सासरकडच्या लोकांनी बराच पाठिंबा दिला.

कोणत्याही स्थितीत न डगमगता त्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करून वेळोवेळी मोलाची साथ दिली. घरच्यांचा पाठिंबा, अहोरात्र मेहनत त्यामुळेच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.

Share This Article