---Advertisement---

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत श्रुतीने मिळवले पोलीस उपनिरीक्षक पद!

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : घरची परिस्थिती बेताची… वडील शेती व्यवसायासह पोल्ट्री व्यवसाय करत असल्याने संपूर्ण कुटुंब त्यावर अवलंबून होते. पण श्रुतीच्या आई – वडिलांनी उच्च शिक्षण देण्यासाठी नेहमीच पाठिंबा दिला. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या आंदर मावळ भागातील फळणे या गावातील श्रुती संजय मालपोटे ही लेक. श्रुतीचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फळणे येथे झाले.

पाचवी ते दहावीचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल टाकवे, बुद्रुक येथे झाले. अकरावी ते बारावीचे शिक्षण व्ही.पी.एस हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, लोणावळा येथे तर बी. कॉमचे शिक्षण प्रोफेसर रामकृष्ण मोरे कॉलेज, आकुर्डी येथे झाले. पदवी शिक्षण झाल्यानंतर तिने एमपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. वडिलोपार्जित शेती व्यवसाय असल्याने तसे कोणतेही शैक्षणिक वातावरण नव्हते. पण तिने जिद्दीने अभ्यास तर केलाच पण मैदानी सराव देखील केला.

---Advertisement---

याच मेहनतीवर तिने सप्टेंबर २०२१ मध्ये पूर्व परीक्षा दिली…तर २०२२ मध्ये मुख्य परीक्षा हि मुलाखत – मैदानी चाचणी असे सर्व टप्पे यशस्वीपणे पूर्ण करून श्रुतीने आपल्या गावातील पहिली महिला पोलीस अधिकारी होण्याचा बहुमान मिळविला. तिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. राज्यात मुलींमध्ये तिचा तिसरा क्रमांक आला आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts