⁠  ⁠

कृषी कन्या सीमा बनली कृषी अधिकारी !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Success Story सोनेवाडी येथे शेतकरी कुटुंबात वाढलेली लेक सीमा.‌ तिला लहानपणापासून कृषी क्षेत्राची आवड होती, कारण शेती आणि त्यावर आधारित तत्सम उद्योग बघतच ती लहानाची मोठी झाली होती. त्यामुळे, तिने देखील कृषी अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील आबासाहेब गोकुळ जावळे यांची कन्या सीमा जावळे हिची महाराष्ट्र लोकसेवा मार्फत घेतलेला परीक्षेतून तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाली.

तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सोनेवाडी तसेच माध्यमिक शिक्षण कर्मवीर शंकरराव काळे विद्यालय सोनेवाडी येथे झाले होते तसेच ती एस जी एम कॉलेजची विद्यार्थिनी होती .तिचे पदवीचे शिक्षण राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत शिवाजीनगर पुणे येथे पूर्ण झाले होते.

ती पुण्यातून स्पर्धा परीक्षेसाठी पुणे येथे अभ्यास करत होती. कृषी विषयात पदवी संपादन केल्यावर तिने सरकारी अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत तालुका कृषी अधिकारी पदी तिने यश संपादन केले.

Share This Article