---Advertisement---

सूरजने जिद्द, चिकाटीने मिळवले विक्रीकर निरिक्षक पद !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : घरची परिस्थिती बेताची असली तरी जिद्दीने अभ्यास करता आला पाहिजे. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द, चिकाटी असेल तर यश मिळतेच. मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण येथील हरी धुळा सुळ यांचे चिरंजीव सूरज हरी सूळ याने एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले आहे.

सूरजचे पहिली ते सातवी शिक्षण हे नूतन मराठी विद्यालय मंगळवेढा येथे झाले. तर आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण हे श्री विलासराव देशमूख विद्यालय, दामाजी स. सा. कारखाना येथे झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करायला त्याने मंगळवेढा गाठले. तिकडे शिक्षण दामाजी कॉलेज, मंगळवेढा येथे पुढील शिक्षण पूर्ण केले. याच ठिकाणी त्याने हिंदी विषयात पदवी घेतली.‌या दरम्यान त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.सूरज अभ्यासाच्या प्रवासात सर्व शिक्षक व मित्रांचे मोलाचे मार्गदर्शन व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले. फक्त आता पोस्ट काढायची हे त्याच्या डोक्यात होते.

त्यामुळे त्याला मार्गदर्शन महत्त्वाचे होते. तहसिलदार सतिश मासाळ व श्रीधर खांडेकर (माजी संचालक दामाजी सहकारी साखर कारखाना )यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणासाठी पुणे गाठले. पुण्यात राहून एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. पण कोरोनाच्या काळात वर्षे फुकट गेले आणि परीक्षा देखील लांबल्या. पण त्याने अभ्यासातील सातत्य कायम ठेवले. यामुळेच २०२१च्या एमपीएससीच्या परीक्षेतून त्याची विक्रीकर निरिक्षक पदी निवड झाली. इतकेच नाहीतर त्याची NT -C वर्गात मधून महाराष्ट्रात दहाव्या क्रमांकाने निवड झाली‌.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts