⁠  ⁠

MPSC Success Story: कोणताही क्लास न लावता शेतकऱ्याची पोरगी झाली अधिकारी..

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून म्हणजेच MPSC कडून दरवर्षी हजारांनो पदांसाठी भरती केली जाते. यातून अधिकारी होण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थी पाहत असतात. त्यासाठी ते रात्रंदिवस अभ्यास करतात. MPSC अभ्यासासाठी काही जण तर मोठं मोठ्या क्लासेस लावतात. मात्र यात काही विद्यार्थी असेही आहेत ते कोणताही क्लास न लावता अधिकारी झाले. याच एक उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्याच्या सुरेखा सौदागर कांबळे.

शेतकऱ्यांची पोरगी असलेली सुरेखा सौदागर कांबळे हिने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एससी वर्गातून राज्यात दुसऱ्या क्रमांक पटकावला आहे.

मोहोळ तालुक्यातील देवडी हे सुरेखा यांचं गाव असून त्यांचे आई-वडिल दोघंही शेती करतात. याच गावातील जिल्हा परिषद शाळेत सुरेखा यांचं शालेय शिक्षण झालं. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण सुरुवातील मोहोळच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये तर नंतर पुण्यातील कृषी महाविद्यालयातून तिनं पदवी पूर्ण केली. पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशासकीय अधिकारी होण्याचं ध्येय सुरेखा यांनी बाळगलं होतं. त्यांनी कोणताही क्लास न लावता या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं.

राज्य लोकसेवा आयोगाच्या 2020 साली झालेल्या परीक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या. नायब तहसीलदार म्हणून त्यांची निवड झाली. सध्या त्या नागपूरमधील वनामती इथं याबाबतचं प्रशिक्षण घेत आहेत. या सर्व प्रवासात त्यांनी राज्यसेवेची परीक्षा दुसऱ्यांदा दिली आणि थेट क्लास वन अधिकारी म्हणून या परीक्षेत यश मिळवलंय. आपल्या यशाची तेच प्रेरणा असल्याचं सुरेखा यांनी यावेळी सांगितलं. आई-वडील आणि भावाने मला नेहमीच साथ दिली आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी हे यश मिळवलंय. प्रशासकीय सेवेत काम करतानाही आई-वडिलांचा आदर्श ठेवून लोकांसाठी काम करण्याचा माझा प्रयत्न असेल.

माझ्यामुळे माझ्या आई-वडिलांचं, गावाचं नाव मोठं व्हावं असं मला नेहमी वाटत असे. या परीक्षेतील यश हे त्या दिशेचं पहिलं छोटसं पाऊल आहे, याचा मला आनंद आहे. इथून पुढंही मी गावाचं नाव उंचावण्याचा प्रयत्न करेन. सामान्य नागरिक म्हणून मी आजवर सरकारी ऑफिस बाहेरुन पाहिलं आहे. अधिकारी म्हणून काम करताना अधिकाधिक लोकांच्या संपर्कात राहण्याचा आणि सर्व यंत्रणा पारदर्शक करण्याचा माझा प्रयत्न असेल,’ असा निर्धार सुरेखा यांनी यावेळी बोलून दाखवला.

दरम्यान, राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलंय. या खडतर परीक्षेत यश मिळवण्यासाठी सातत्य, जिद्द आणि कमिटमेंट या गोष्टी महत्त्वाच्या असतात. ग्रामीण आयुष्यात असणारा संघर्ष आणि वास्तवाची जाण असल्यानं या विद्यार्थ्यांना या सवयी सहज अंगवळणी पडतात.

Share This Article