कृषी कन्येची एमपीएससीच्या परीक्षेत बाजी ; वाचा स्वातीची यशाची कहाणी!
MPSC Success Story : गावातील मुलगी…शेतकऱ्याची लेक जेव्हा उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षा पास करते. तेव्हा अनेकांसाठी हा आदर्श निर्माण होतो. स्वाती नामदेव होन ही अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याच्या एका शेतकऱ्याची लेक.स्वाती हिचे प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण राधाबाई काळे विद्यालयात झाले. तर उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी एसएसजीएम महाविद्यालयात घेतले. पुढे मग त्यांनी संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मधून सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने नामांकित खाजगी कंपनीत काम करण्याची संधी देखील उपलब्ध झाली.
पण तिने ती संधी नाकारली.स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. कोरोना काळात त्यांनी घरातूनच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू ठेवला.यांनी कठोर मेहनत घेऊन एमपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. स्वाती यांची एमपीएससीतून सार्वजनिक बांधकाम विभाग येथे सहाय्यक अभियंता या पदावर निवड झाली आहे
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास नीट समजून घेत, वेळेचे नियोजन केले. आठ ते दहा तास अभ्यास करण्याची तयारी ठेवली, तर यश हमखास मिळू शकते. हे स्वाती यांनी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात असली तरी तिने हे दाखवून दिले आहे. यामुळेच, एमपीएससी उत्तीर्ण होऊन नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागात तिची सहायक स्थापत्य अभियंता म्हणून निवड झाली आहे.आता मुली कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेले नाहीत. प्रत्येक क्षेत्रात शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकतात. हे स्वातीने दाखवून दिले आहे.