MPSC Success Story खरंतर, स्पर्धा परीक्षेचा अनेक होतकरू मुले-मुली कष्ट करणारे, जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करणारे आहेत. आज समाजाला मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्याकरिता समाजाने व कुटुंबातील अश्या होतकरू मुले, मुलींना, प्रामुख्याने मुलींना मार्गदर्शन, व त्यांनांचे मनोबल वाढविण्याचे काम करणे गरजेचे आहे.
अशाच मुस्लिम समाजातील गरीब कुटुंबात वाढलेली तमन्ना शेख. हिच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट, आई शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावते, वडील फोर्स मोटर्स कंपनीत कामगार आहेत. तमन्नाची संपूर्ण जडणघडण ही थेरगाव येथील आनंदवन सोसायटीत झाली. अशा या शेख कुटुंबातील तमन्ना हिने कुठलाही क्लास न लावता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. तिसऱ्या प्रयत्नामध्ये मुलींमध्ये राज्यात आठवी, सर्वसाधारण गटात १०६ वी येऊन नायब तहसीलदार पदी निवड झाली.
तमन्नाचे प्राथमिक शिक्षण थेरगावमधील लक्ष्मीबाई धांईजे विद्यालयात झाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण चिंचवडमधील ताराबाई शंकरलाल मुथ्था कन्या प्रशालेत झाले. बीएससी स्टॅटेस्टिक्स पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून व एमएससी स्टॅटेस्टिक्स मॉडर्न महाविद्यालयातून केले. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. या प्रवासात तिला दोनदा अपयश आले परंतू तिसऱ्या प्रयत्नात तिने बाजी मारली. २०१८-२०१९ मध्ये पूर्ण वेळ अभ्यास करुन, स्पर्धा परीक्षेतील पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाली. पण, मुख्य परीक्षेमध्ये अपयश आले. तिने चूका लक्षात घेऊन नव्याने अभ्यास सुरू केला. याच दरमुनेट परीक्षाही उत्तीर्ण झाली. कारण, स्पर्धा परीक्षेत अपयश आले, तरी स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सहप्राध्यापक पदासाठी तयारीकेली. पुढे, तिने डिसेंबर २०२१ मध्ये मुख्य परीक्षा व एप्रिल २०२२ मध्ये मुलाखत दिली आणि यश मिळविले. अखेर, ती नायब तहसीलदार झाली.
खरंतर, स्पर्धा परीक्षांमध्ये संयम, सातत्य व कष्टाशिवाय पर्याय नाही. स्वत:ची क्षमता व कमतरता ओळखून परीक्षेची तयारी केली तर यश हे मिळतेच.