सहाय्यक विक्रीकर आयुक्त ते जिल्हाधिकारी पद ; पुण्याच्या तृप्तीचा प्रेरणादायी प्रवास!

MPSC Success Story : एकाचवेळी वेगवेगळ्या भूमिका निभावत अनेक अडचणींसह जुळून घेता आले पाहिजे. हा अनुभव तृप्तीच्या देखील काही आला. त्याचा तिला परीक्षेसाठी देखील फायदा झाला.वाचा हा तिचा प्रेरणादायी प्रवास…

तृप्तीने आधी अभियांत्रिकी क्षेत्रात काम केल्यामुळे तिथल्या अडचणी, मग प्रशासनात काम करताना तिथल्या अडचणी, कौटुंबिक पातळीवरही अनेक गोष्टी नव्याने कळल्या. तिला दोन्हीकडच्या कुटुंबांनी खूपच पाठिंबा दिला. त्यामुळे, ती युपीएससी परीक्षेत सोळाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

तृप्ती ही पुण्याची रहिवासी आहे. तिने शासकीय महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलं. हे पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी L&T या कंपनीत काही वर्षं काम केले. नोकरी करता करताच त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. एमपीएससीच्या परीक्षेतून त्यांची सहायक विक्रीकर आयुक्त या पदावर त्यांची निवड झाली. ती तेवढ्यावरच थांबली नाहीतर युपीएससी परीक्षेची तयारीला सुरुवात केली. तृप्ती पहिल्या प्रयत्नात पूर्वपरीक्षा पास झाली नाही. दुसऱ्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत पोहोचली. मात्र अंतिम यादीत निवड झाली नाही. तिसऱ्या प्रयत्नात पूर्वपरीक्षेतच नापास झाले. पण चौथ्या प्रयत्नात शेवटी हे यश मिळाले.

पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा तीन स्पर्धा परीक्षेतल्या या प्रदीर्घ प्रवासाबद्दल बघता तृप्तीने नोकरी करून संसार सांभाळत हा सर्व अभ्यास केला. यातील प्रत्येक समस्येला आव्हान म्हणून न बघता सकारात्मक दृष्टिकोनातून बघितले. त्यामुळेच ती जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचली.