आता प्रत्येक क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवत आहेत. पोलिस क्षेत्रातील महिलांची कामगिरी ही देखील कौतुकास्पद आहे. अशाच, पोलिस अधिक्षक वैशाली माने. वैशाली यांची घरची परिस्थिती चांगली होती. घरी शैक्षणिक वातावरण असल्याने त्यांना योग्य वयात योग्य वाट मिळाली. त्या जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्राचार्य उत्तमराव माने यांच्या द्वितीय कन्या आहेत.
त्या मूळच्या पाटण तालुक्यातील मानेवाडी येथील रहिवासी. त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील हत्तीखाना येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण कन्या शाळा सातारा येथे झाले. तसेच पदवीपुर्व शिक्षण सायन्स कॉलेज सातारा येथे झाले त्यानंतर इस्माईल मुल्ला लॉ कॉलेज मध्ये बीएसएलएलबीची पदवी घेतली. त्यांनी एलएलएम ची मास्टर डीग्री ही संपादन केली आहे. या दरम्यान त्यांनी एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी फक्त अहोरात्र अभ्यास केला नाहीतर मैदानी सराव देखील केला. या त्यांच्या मेहनतीला यश मिळाले.
२००९ साली एमपीएसीची परिक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची डीवायएसपी पदी निवड झाली. त्यानंतर त्या नाशिक येथे एकवर्षाच्या ट्रेनिंग करीता रवाना झाल्या. नंतर सिंधुदुर्ग येथे प्रोबेशन ट्रेड पुर्ण करून कोल्हापूर येथे डीवायएसपी म्हणून दोन वर्षे कार्यकाळ सांभाळले.सध्या त्या राज्य गुन्हे अन्वेशन विभागाच्या अतिरिक्त पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांची पोलीस अधिक्षक म्हणून काम बघत आहेत. त्यांचे या क्षेत्रातील काम हे खरोखरच कौतुकास्पद आहे.