⁠  ⁠

अपयश आले तरी हरले नाही; शेतकऱ्याच्या मुलाची उपजिल्हाधिकारी पदाला गगनभरारी!

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Success Story : आपले आयुष्यात ठरवलेले स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. तसेच नेवासा तालुक्यातील गेवराई येथील शेतकरी कुटुंबातील विकास मनसुक कर्डिले यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे स्वप्न उराशी बाळगले आणि ते अथक परिश्रमाने सत्यात उतरले. विकास यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली आहे.

नेवासा तालुक्यातील गेवराई येथील रहिवासी आहेत.‌ लहानपणापासून त्यांची जडणघडण शेतकरी कुटुंबात झाली. शेतीकामात मदत करतच त्यांनी देखील शालेय शिक्षण पूर्ण केले.विकास यांचे प्राथमिक शिक्षण गेवराई जिल्हा परीषद शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण गेवराई येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे झाले. एवढेच थांबून चालणार नाही त्यामुळे त्यांनी उच्च शिक्षणासाठी न्यू आर्टस् कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षणानंतर पुण्याच्या ढोले पाटील येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान त्यांना स्पर्धा परीक्षेची ओळख झाली आणि त्यांनी अभ्यास सुरू केला.

पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्यानुसार त्यांना २०१९, २०२० असे दोन वेळा एमपीएससी परीक्षेत त्याला अपयश आले. मात्र, २०२२ च्या परीक्षेत मात्र त्याने यश गाठले. विकास कर्डिले यांना दोन अपयशाच्या नतंर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत यश मिळाले. त्यांनी एमपीएससी परीक्षेत ११ वी रँक मिळवत उपजिल्हाधिकारीपदी गवसणी घातली.

Share This Article