MPSC Success Story एखाद्या गावातील सामान्य कुटुंबातील मुलगा जेव्हा प्रशासकीय अधिकारी सेवेत रूजू होतो. त्याचा तो प्रवास सगळ्यांना प्रेरणा देणारा असतो. असाच फलटण तालुक्यातील सासकल या गावातील विकास चंद्रकांत मुळीक. याची तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकल येथून तर माध्यमिक शिक्षण शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल येथे पूर्ण झाले. कृषी क्षेत्राची आवड असल्याने त्याने शासकीय कृषी विद्यापीठातून बी.एस्सी कृषी क्षेत्राची निवड केली. याच दरम्यान त्याने स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेतला. आपल्या उच्च शिक्षणाबरोबरच रोजगाराची संधी मिळवायची असेल तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा. या उद्देशाने त्याने अभ्यास करायला सुरुवात केली. त्याला कुटुंबाचा बराच पाठिंबा लाभला. आई आणि मामाने त्यास नेहमीच प्रोत्साहन दिले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही चिकाटीच्या बळावर विकास चंद्रकांत मुळीक याने हे यश संपादन केले त्यामुळेच, .महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कृषी सेवा परीक्षा घेतल्या जातात. त्याने या परीक्षेत २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यातून ३२वा क्रमांक मिळवला.त्याची तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. मित्रांनो, आपली जिद्द असेल तर स्वप्न नक्कीच पूर्ण होतात.