⁠  ⁠

शेतकरीपूत्राने करून दाखवलं; उपजिल्हाधिकारी पदी गगनभरारी!

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC Success Story : संपूर्ण बालपण शेतकरी कुटुंबात, जे काही उत्पादन यायचे त्यावर उदरनिर्वाह करून कुटुंब चालत विलास यांचे वडील बळीराम पांडुरंग नरवटे हे शेतकरी असून त्याची आई कलावतीबाई देखील शेतात दिवसभर कष्ट करतात. याच कष्टाचे फळ म्हणून विलास उपजिल्हाधिकारी झाला.

विलासचे शालेय शिक्षण गावातच झाले. त्यानंतर त्यांनी मॅकेनिकल इंजिनिअरिंग आणि वकिली हे दोन्ही शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर विलास यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पुणे शहरात राहणे व अभ्यासाचा खर्च मोठ्या प्रमाणात होता.

घरची परिस्थिती हलाकीची होती कारण घरचा सर्व कारभार शेतावर अवलंबून होता. पुढे मग विलास यांचे मोठे भाऊ जिजाराम यांना पोलीस दलात नोकरी मिळाली. त्यानंतर त्यांनी कुटुंबाची जबाबदारी घेऊन आपल्या पगारातून काही पैसे विलास यांना दर महिन्याला खर्चासाठी द्यायचे.

आई – वडील देखील अभ्यास व परीक्षा याची कायम विचारपूस करायचे.त्यांच्या त्या विचारण्यामुळे त्यांना सतत कर्तव्याची कुटुंबासाठी मेहनत केली पाहिजे ही जाणीव व्हायची. त्यामुळेच, ते कधीही भरकटू शकले नाही. कुठलीही परस्थिती ही आपण बघितलेल्या स्वप्ना पेक्षा मोठी नसते.आपले प्रयत्न प्रामाणिक असतील तर यश हे आपल्याला कायम मिळते. याच सातत्याने २०२० मध्ये विलास यांना सहकार विभागात सहायक निबंधक म्हणून नोकरी मिळाली पण उपजिल्हाधिकारी व्हायचे या ध्यासासाठी परिस्थितीशी जुळवून अभ्यास करत राहिले. नवनवीन नोट्स काढणे, त्यांचे वाचन, संभाषण कौशल्यावर भर याच विचाराने त्यांनी उपजिल्हाधिकारी पद देखील मिळवले.

Share This Article