⁠  ⁠

सर्वसामान्य शेतकऱ्याच्या लेकाने केली कमाल ; प्रतिकूल परिस्थितीतही राज्यकर निरीक्षक पदाला गवसणी !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Success Story कोणत्याही सोयीसुविधा नसताना देखील प्रशासकीय अधिकारी होणे हा खरोखरच प्रेरणादायी प्रवास आहे. एका शेतकरी कुटुंबात वाढलेल्या लेकाने साहेब होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.सिन्नर शहरातील मळहद्द येथील विशाल संजय उगले या तरुणाने राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत यशस्वीरीत्या उत्तीर्ण होऊन राज्यकर निरीक्षक पदाला गवसणी घातली‌ आहे. त्याचा संपूर्ण जीवन प्रवास मोठा जिकिरीचे होता.

विशालचे वडील संजय उगले सर्वसामान्य शेतकरी.नववी शिकलेले वडील व आठवी शिकलेली आई अनिता यांनी स्वतः अल्पशिक्षीत असूनही मुलांच्या शिक्षणासाठी हालअपेष्टा सहन करुन सदैव प्रोत्साहन दिले. विशालनेही त्याची जाणीव ठेऊन आईवडीलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.
विशालचे शालेय शिक्षण हे विशालचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मापारवाडी शाळेत झाले. त्यानंतर लोकनेते शं.बा. वाजे विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेऊन पुढे मॅकेनिकल इंजिनिअरींगची पदवी प्राप्त केली. इंजिनिअरिंग करत असताना त्याला स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली. त्यासाठी त्याची धडपड सुरू राहिली. त्यांनी जवळपास सहा वर्षे अभ्यास केला.

यात त्याला यश आले तर कधी अपयश आले. तो चूकांमधून शिकला आणि अपयशातून मार्ग शोधू लागला. कधी दोन गुणांनी देखील पोस्ट गेली होती. तर कधी निराशा आली. या सगळ्यात आई – वडील व बहिणीचा मोठा वाटा होता. त्यामुळे तो देखील मेहनतीच्या बळावर जिद्द व चिकाटीच्या भरोशावर लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण करीत राज्य कर निरीक्षक अधिकारी या पदासाठी पात्र ठरला.

Share This Article