⁠  ⁠

आई – वडिलांचा आधार गेला; तरी जिद्दीने उस्मानाबादच्या विष्णूची प्रशासकीय अधिकारी पदी निवड!

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC Success Story : विष्णू कांबळे हा निलंगा तालुक्यातील मदनसुरी रहिवासी विष्णू अवघा चार वर्षाचा असताना घरगुती हिंसाचारामुळे त्यांच्या आईचे निधन झाले. तर खुनाच्या आरोपाखाली वडील कारागृहात शिक्षा भोगत होते. आई – वडीलांचा हक्काचा आधार कायमस्वरूपी गेला होता. तेव्हापासून त्यांचा सांभाळ मामा आणि आजी यांनी त्यांच्या आजोळी केला.

विष्णूचे शालेय जि. प. प्राथमिक शाळा चिंचोली भुयार उमरगा येथे झाले. पुढील शिक्षणाची आजोळी सोय नसल्यामुळे लातूर येथील मावशीकडे राहून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. लहानपणी हुशार असलेल्या विष्णूने ९०टक्केसह दहावी उत्तीर्ण केली. पुढे, लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन लातूर येथे सिव्हील इंजिनिअरच्या वर्गात त्यांनी प्रवेश घेतला.

गुरू गोविंद सिंह अभियांत्रिकी विद्यालय नांदेड येथे प्रवेश घेतला. परंतू घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे समाज कल्याण वसतिगृहात येथे राहून शिक्षण पूर्ण केले. त्याचबरोबर, नोकरी देखील केली.‌नोकरी करत असताना नोकरीचा ताण होताच त्यासोबत कोविडची ड्युटी करत असताना कोरोना झाला होता. कोरोना काळातही अभ्यासात खंड पडू दिला नाही.

दिवसा नोकरी व रात्री अभ्यास असे सूत्र वापरून पूर्व, मुख्य व मुलाखत असे परीक्षेचे तीन टप्पे पार करून एमपीएससी परीक्षा पास होऊन सहाय्यक कार्यकारी अभियंता (क्लास -१ pwd) पदी निवड झाली आहे. एमपीएससीमार्फत झालेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२० मध्ये विष्णू कांबळे यांनी खुल्या प्रवर्गातून ४१ वा क्रमांक प्राप्त केला आहे. तर अनुसूचित जाती (sc) प्रवर्गातून ते राज्यात प्रथम आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग (pwd) मध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता (assistant Executive Engineer) पदी निवड झाली आहे.

Share This Article