दरवर्षी महाराष्ट्र कृषी सेवा, वन आणि अभियांत्रिकी सेवा परीक्षा स्वतंत्रपणे घेतल्या जात होत्या. मात्र, आता या तिन्ही परीक्षा एकत्रित होणार असून त्याची तयारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली आहे. 2021 पासून पुढे येणाऱ्या प्रत्येक जाहिरातीनुसार रिक्तपदांची भरती करताना त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
स्वतंत्रपणे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा आता होणार एकत्र..
कधीपासून सुरूवात होणार :
२०२१पासून पुढे येणाऱ्या प्रत्येक जाहिरातीनुसार रिक्त पदांसाठी भरती होणार आहे.
परीक्षा स्वरूप :
या तीनही परीक्षेंकरिता एकच पूर्व परीक्षा असेल : १०० प्रश्नांची : २०० गुणांची ही पूर्व परीक्षा असणार आहे.
पण या तिन्ही विभागांच्या मुख्य परीक्षा स्वतंत्रपणे होणार आहेत.
निगेटिव्ह मार्किंग :
निगेटिव्ह मार्किंग ही १/४ या प्रमाणे : दोन गुणांच्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे लिहिल्यास 0.5 टक्के तर एक गुणाचे उत्तर चुकल्यास 0.25 टक्के गुण कपात केले जाणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या कृषी, वन व अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी सुमारे एक ते दीड लाख विद्यार्थी अर्ज करतात. उमेदवारांची संख्या कमी असतानाही तिन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेतल्याने त्यांचा वेळ वाया जातो. राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेअंतर्गत 27 प्रकारची पदे भरली जातात. या पार्श्वभूमीवर कृषी, वन आणि अभियांत्रिकीच्या परीक्षा एकत्रित घेतल्या जाणार आहेत.