---Advertisement---

MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मोठी भरती ; पगार किती मिळेल?

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MSRTC Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाअंतर्गत सातारा येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने करायचा असून १३ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
एकूण रिक्त जागा : १४५

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
१) मोटार मेकॅनिक वाहन – ४० जागा
२) मेकॅनिक डिझेल – ३४ जागा
३) मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर – ३० जागा
४) ऑटो इलेक्ट्रिशियन – ३० जागा
५) वेल्डर – २ जागा
६) टर्नर – ३ जागा
७) प्रशितन व वातानुकुलिकरण – ०६ जागा
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार किमान दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा आणि त्याने संबधित ट्रेड मधील आयटीआय कोर्स पूर्ण केलेला असावा. या व्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

इतका पगार मिळेल:
मोटार मेकॅनिक वाहन – ८ हजार ५० रुपये
मेकॅनिक डिझेल – ७ हजार ७०० रुपये
मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर – ७ हजार ७०० रुपये
ऑटो इलेक्ट्रिशियन – ८ हजार ५० रुपये
वेल्डर – ७ हजार ७०० रुपये
टर्नर – ८ हजार ५० रुपये
प्रशितन व वातानुकुलिकरण – ७ हजार ७०० रुपये

नोकरी ठिकाण – सातारा
अर्ज पद्धती –
ऑनलाइन आणि ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ जानेवारी २०२४
अर्जाची प्रत ऑफलाइन पाठविण्यासाठी पत्ता – विभाग नियंत्रक कार्यालय , ७ स्टार बिल्डिंग च्या मागे , एस. टी. स्टॅण्ड जवळ , रविवार पेठ, सातारा – ४१५००१

अधिकृत संकेतस्थळ : msrtc.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now