---Advertisement---

Home Guard Bharti : बृहन्मुंबईत होमगार्डच्या 2771 जागांसाठी भरती; पात्रता फक्त 10वी पास

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Mumbai Home Guard Recruitment 2025 : 10वी पास असलेल्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. बृहन्मुंबईमधील होमगार्डसाठी भरतीची (Home Guard Bharti) अधिसूचना निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ओनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 2771

पदाचे नाव : होमगार्ड
शैक्षणिक पात्रता: किमान 10वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता:
उंची :
पुरुषांकरीता १६२ से.मी. महिलांकरीता १५० से. मी. ३.
छाती : (फक्त पुरुष उमेदवारां करीता (न फुगविता किमान ७६ से.मी. व फुगवून ८१ सें.मी.)

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जुलै 2024 रोजी 20 ते 50 वर्षे.
परीक्षा फी : फी नाही
होमगार्ड ना देय भत्ते?
होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. १०८३/- कर्तव्य भत्ता व रु. २००/- उपहार भत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रु. २५०/- भोजनभत्ता व खिसा भत्ता म्हणून रु.१००/- तसेच साप्ताहिक कवायतीसाठी रु. १८०/- कवायत भत्ता दिला जातो.

आवश्यक कागदपत्र :
रहीवासी पुरावा-आधारकार्ड मतदान ओळखपत्र (मुंबई व उपनगर रेल्वे लगतच्या परिसरात राहणा-या उमेदवारांचे कागदपत्र ग्राहय धरले जातील, बाहय जिल्हयातील कागदपत्र ग्राहय धरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी)
शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
जन्म दिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला.
तांत्रिक अहर्ता धारण करीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र, (तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण मेरीट लावतेवेळी ग्राहय धरले जातील, अन्यथा तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण ग्राहय धरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.)
खाजगी नोकरीकरीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र,
भरतीनंतर ३ महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी व वैद्यकिय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

शारिरीक क्षमता चाचणी-
उमेदवारांना प्रत्येक शारिरिक चाचणी प्रकारात उत्तिर्ण गुण मिळवून पात्र होणे आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत.

नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2025
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now