नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या 110 जागांसाठी भरती
NMMC Recruitment 2024 नवी मुंबई महानगरपालिकामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 01 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 110
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी – 55
शैक्षणीक पात्रता : 01) मान्यता प्राप्त विदयापीठाची एम.बी.बी.एस. पदवी. 02) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी बंधनकारक 03) शासकीय / खाजगी यांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक. किंवा 01) मान्यता प्राप्त विदयापीठाची एम.बी.बी.एस. पदवी धारकास प्राधान्य देण्यात येईल. 02) एम.बी.बी.एस. पदवी धारक उपलब्ध न झाल्यास 6 ते 11 महिन्यांकरीता अथवा उपलब्ध होई पर्यंत बी.ए.एम.एस. पदवी धारक उमेदवारास तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल. 03) मान्यता प्राप्त विदयापीठाची बी.ए.एम.एस. पदवी. 04) महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिकल नोंदणी बंधनकारक 05) शासकीय / खाजगी यांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक.
2) स्टाफ नर्स (स्त्री) – 49
शैक्षणीक पात्रता : 01) 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा किंवा बी.एस्सी 02) महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक
3) स्टाफ नर्स (पुरुष) -06
शैक्षणीक पात्रता : 01) 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा किंवा बी.एस्सी 02) महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 ते 70 वर्षापर्यंत [राखीव – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार :
वैद्यकीय अधिकारी -60,000/-
स्टाफ नर्स (स्त्री) – 40,000/-
स्टाफ नर्स (पुरुष) – 20,000/-
नोकरी ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 01 फेब्रुवारी 2024
मुलाखतीचे ठिकाण : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400614.
अधिकृत संकेतस्थळ : www.nmmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा