⁠
Jobs

महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागात 446 जागांसाठी भरती सुरु, 10ते पदवीधरांना मोठी संधी..

Pashusavardhan Vibhag Recruitment 2023 : पशुसंवर्धन विभाग अंतर्गत विविध पदे भरण्यासाठीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रकीर्या 27 मे 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे

एकूण रिक्त जागा : 446

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पशुधन पर्यवेक्षक 376
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा कृषी पदवी किंवा समतुल्य.

2) वरिष्ठ लिपिक 44
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर

3) लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

4) लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क) 13
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

5) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क) 04
शैक्षणिक पात्रता
: (i) रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सुक्ष्मजीवशास्त्र विषयांसह विज्ञान पदवी (ii) प्रयोगशाळा वैद्यकीय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा

6) तारतंत्री (गट-क) 03
शैक्षणिक पात्रता :
(i) ITI (तारतंत्री) (ii) 01 वर्ष अनुभव

7) यांत्रिकी (गट-क) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (डिझेल मेकॅनिक) (iii) 02 वर्षे अनुभव

8) बाष्पक परिचर (गट-क) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) बाष्पक आणि धुराचा उपद्रव संस्थेचे द्वितीय श्रेणीचे प्रमाणपत्र

वयोमर्यादा: 01 मे 2023 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी :
अमागास: ₹1000 /-
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग /माजी सैनिक: 900/-

निवड प्रक्रिया :
ऑनलाइन परीक्षा
प्रमाणपत्र पडताळणी
वैद्यकीय चाचणी

पात्र उमेदवारांना इतका पगार मिळेल?
पशुधन पर्यवेक्षक – 25500-81100
वरिष्ठ लिपिक – 25500-81100
लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क) – 41800-132300
लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क) – 38600-122800
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क) – 35400-112400
तारतंत्री (गट-क) – 19900-63200
यांत्रिकी (गट-क) – 19900-63200
बाष्पक परिचर (गट-क) – 19900-63200

नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 27 मे 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जून 2023
अधिकृत संकेतस्थळ :

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button