पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे येथे विविध पदांच्या १३९ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज सक्षम उपस्थित राहून सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे पासून ते 1 जून 2021 आहे.
एकूण जागा : १३९
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) वरिष्ठ रहिवासी/ Senior Resident ६१
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस + डिप्लोमा एमडी/एमएस / डीएनबी. एम.एम.सी. रजि.अद्यावत असणे आवश्यक.
२) कनिष्ठ रहिवासी/ Junior Resident ६३
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस/ बी.डी.एस./एम.डी.सी., एम.एम.सी. रजि.अद्यावत असणे आवश्यक.
३) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer १५
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील एमबीबीएस/ डीसीपी पदवी उत्तीर्ण व एफडीए मंजूर, एमडी प्राधान्य, एम.एम.सी. रजि.अद्यावत असणे आवश्यक.
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) :
१) वरिष्ठ रहिवासी/ Senior Resident – ७५,००० /-
२) कनिष्ठ रहिवासी/ Junior Resident – ७५,०००/-
३) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ७५ ००० ते ८५ ०००/-
नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
अर्ज पद्धती – सक्षम
अर्ज सादर करण्याचा पत्ता – यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील चाणक्य प्रशासकीय कार्यालयातील हॉलमध्ये
अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 मे 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 जून 2021 आहे.
अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
अटी व शर्ती :
१. मानधनावरील नेमणुका पुर्णपणे तात्पुरत्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे अर्जदारास कोणत्याही कायमपदी नेमणुकीचा हक्क राहणार नाही.
२. ज्या दिवशी म.न.पास सदर पदाची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटिशीशिवाय त्यांची मानधनावरील सेवा संपुष्टात आणण्यात येईल.
३. लेखी परिक्षेस व मुलाखतीस येण्या-जाण्याकरीता उमेदवारास कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
४. उपरोक्त पदांना विहित केलेनुसार तसेच शैक्षणिक अर्हता व कामाच्या अनुभवानुसार मानधन अदा केले जाईल.
५. अर्जासोबत सादर केलेला अनुभवाचा दाखला खोटा असल्याचे निर्दशनात आलेस तो अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही.
६. सर्व उमेदवारांनी लेखी परिक्षेसाठी व मुलाखतीसाठी उपस्थित राहताना शैक्षणिक अर्हता, जातीचे प्रमाणपत्र व अनुभवाबाबतच्या आवश्यक त्या मुळ प्रती व साक्षांकित केलेल्या सत्य प्रती उदा. गुणपत्रिका (मार्कशीट) सर्टिफिकेट, अद्यायावत रजिस्ट्रेशन, फोटो, इतर कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहेत.
७. निवड केलेल्या उमेदवारांना म.न.पा.ने ठरवून दिलेल्या अटी शर्तीनुसार कामकाज करणे बंधनकारक राहिल. रूग्णालयीन / कोरोना संबंधी काम करणेस नकार दिलेस नेमणुक रद्द करण्यात येईल.
८. सदर पदांना महाराष्ट्र आरक्षण कायदा २००४ नुसार मागासवर्गीयांचे आरक्षण लागू राहील.
९. वरिष्ठ व कनिष्ठ निवासी यांना २४ तास रूग्णालयात राहुन काम करावे लागेल. ज्या युनिटमध्ये किंवा वॉर्डामध्ये नेमणुक होईल त्यांचे अधिपत्याखाली काम करावे लागेल.
१०. यापुर्वी मागील सहा महिने कालावधीत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात काम केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करू नये. त्यांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
मुख्य अटी खालील प्रमाणे राहतील
– उमेदवारांना रुग्णालयीन कामकाजाच्या वेळा पाळणे बंधनकारक राहील. त्यामध्ये कोणतीही सवलत अनुज्ञेय नाही.-
उमेदवारांची नेमणुक झालेनंतर बायोमेट्रीक पध्दतीने हजेरी नोंदविणे बंधनकारक राहील व हजेरी मस्टरवर रोजचे रोज स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. त्याशिवाय मानधन अदा केला जाणार नाही.
– उमेदवारांना वयाची अट लागु राहणार नाही.