पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आशा स्वयंसेविका पदांच्या एकूण १०६ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ जून ते २५ जून २०२१ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत आहे.
एकूण जागा : १०६
पदाचे नाव : आशा स्वयंसेविका/ Asha Volunteer
शैक्षणिक पात्रता : किमान ०८ वी परीक्षा उत्तीर्ण
वयोमर्यादा : २५ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत.
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
अति व शर्ती
1. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत भरण्यात येणा-या आशा स्वयंसेविका पदावरील उमेदवाराची कोविंड-१९ संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर मुलाखतीव्दारे निवड न करता शैक्षणिक पात्रता, अनुभव व इतर अर्हतेच्या आधारे तयार करण्यात येणा-या गुणांकनानुसार गुण देण्यात येवून निवड करण्यात येईल.
2. सदरची पदे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत राहतील, सदर पदांचा पिंपरी चिंचवड म.न.पा. आस्थापनेशी कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही.
3. सदरची पदे केवळ प्रकल्प कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरुपात भरावयाची असून ३१ मार्च २०२२ पर्यंत प्रकल्प बंद होताच सदरील पदे आपोआप संपुष्टात येतील.
4. सदरची पदे पुर्णपणे केवळ प्रकल्प कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरुपात भरावयाची असल्याने अर्जदारास कायमपदी नियुक्तीचा हक्क सांगता येणार नाही. ज्या दिवशी पिंपरी चिंचवड महानगरपालिका- कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटीस सदर पदांची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटीशीशिवाय त्यांची सेवा समाप्त केली जाईल. याकामी नियुक्ती वेळी रु.१०० चे स्टॅम्प पेपरवर बंधपत्र (करारनामा) करून द्यावा लागेल..
5. सदर जाहिरातीमधील पदसंख्येमध्ये बदल होऊ शकतो.
6. सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार मा. आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी राखून ठेवलेले आहेत.
7 आशा स्वयंसेविका जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या कामकाज क्षेत्राची स्थानिक/कायमची रहिवाशी असावी. जर जाहिरातीमध्ये नमुद कार्यक्षेत्राची आशा स्वयंसेविका उपलब्ध न झाल्यास लगतच्या कार्यक्षेत्रातील आशा स्वयंसेविका यांचे पात्र अर्जाचा विचार केला जाईल.
8. आशा स्वयंसेविकेस मासिक ठोक वेतन, मानधन अथवा कोणताही एकत्रित दरमहा भत्ता अदा केला जाणार नाही.
9. नियुक्त आशा स्वयंसेविकेस शासन आदेशानुसार कामावर आधारित मोबदला डी.बी.टी. व्दारे थेट बैंक खात्यावर केला जाईल व शासनाकडून वेळोवेळी प्राप्त सूचना लागू राहतील.
10. सदर पदभरतीची निवड व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येईल.
11. परिपूर्ण भरलेला अर्ज व पुढील आवश्यक कागदपत्रे जोडण्यात आलेले अर्ज पात्र होतील अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा (संबंधित पत्त्यावर येथे क्लिक करा)
अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा