पिंपरी चिंचवड महानगरपालिके मार्फत बंपर भरती जाहीर ; 10वी पास महिलांना मोठी संधी..
PCMC Recruitment 2023 पिंपरी चिंचवड महानगरपालिका मार्फत भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात निघाली असून त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 मे 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 154
पदाचे नाव: आशा स्वयंसेविका
शैक्षणिक पात्रता:
किमान 10वी उत्तीर्ण. अथवा उच्चशिक्षित महिलांना प्राधान्य
विवाहित महिलांना प्राधान्य
उमेदवार जाहिरातीमधील नमूद स्थानिक वस्तीमधील कायमची रहिवाशी असणे आवश्यक
वयाची अट: 25 ते 45 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
अटी व शर्ती-
१) सदरची पदे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत राहतील, सदर पदांचा पिंपरी चिंचवड म.न.पा. आस्थापनेशी कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही. तसेच म.न.पा. कायम आस्थापनेवर सामावुन घेणेबाबत भविष्यात कोणत्याही न्यायालयात केस/दावा दाखल करता येणार नाही.
२) सदरची पदे केवळ प्रकल्प कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरुपात भरावयाची असून ३१ मार्च २०२३ पर्यंत अथवा प्रकल्प बंद होताच आपोआप संपुष्टात येतील.
(३) सदर जाहिरातीमधील पदसंख्येमध्ये बदल होऊ शकतो.
४) सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार मा. आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी राखुन ठेवलेले आहेत.
५) आशा स्वयंसेविका जाहिरातीमध्ये नमुद कलेल्या कामकाज क्षेत्राची स्थानिक/कायमची रहिवाशी असावी. जर जाहिरातीमध्ये नमुद कार्यक्षेत्राची आशा स्वयंसेविका उपलब्ध न झाल्यास लगतच्या रहिवाशी कार्यक्षेत्रातील आशा स्वयंसेविका यांचे पात्र अर्जांचा विचार केला जाईल.
(६) आशा स्वयंसेविकेस मासिक ठोक वेतन, मासिक मानधन अथवा कोणताही एकत्रित दरमहा भत्ता अदा केला जाणार नाही.
७) नियुक्त आशा स्वयंसेविकेस शासन आदेशानुसार कामावर आधारित मोबदला डी.बी.टी.व्दारे थेट बैंक खात्यावर अदा केला जाईल व शासनाकडून वेळोवेळी प्राप्त सुचना लागू राहतील.
८) सदर पदभरतीची निवड व प्रतिक्षा यादी महापालिकेच्या संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in वर प्रसिध्द करण्यात येईल
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता: मुलाखतीचे ठिकाण : महापालिकेच्या आकुर्डी, यमुनानगर, भोसरी, नेहरूनगर, सांगवी, तालेरा, जिजामाता,नवीन थेरगाव, आदी विविध रुग्णालयात (सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचा.)
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 25, 26,27,28, 29 एप्रिल & 02, 03, & 04 मे 2023 (09:00 AM ते 12:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : https://www.pcmcindia.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा