पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे येथे ८४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 मे 2021 आहे.
एकूण जागा : ८४
पदाचे नाव :ए.एन.एम./ ANM
शैक्षणिक पात्रता :
०१) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल यांचेकडील मान्यताप्राप्त ए.एन.एम.अथवा जी.एन.एम. कोर्स उत्तीर्ण अथवा बी.एस्सी. नर्सिंग उत्तीर्ण असणे आवश्यक
०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडील अद्यावत नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक.
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २३,३००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)
निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखतीची तारीख :13 मे 2021
मुलाखतीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आरोग्य विभाग, २ रा मजला, पिंपरी, पुणे – १८.
अटी व शर्ती
१) उक्त पदावरील कर्मचा-यांना रुग्णालयीन कामकाज, कोवीड-१९ चे लसीकरण, कॉन्ट्रक्ट ट्रेसिंग, स्वॅब टेस्टिंग, नव्याने सुरु होणारे कोवीड केअर सेंटर, गृह विलगीकरण कक्षातील (Home Isolation) रुग्णांची माहिती घेणेकामी तसेच कोवीड-१९ अनुषंगाने झोननिहाय इतर सर्व कामकाज करणे बंधनकारक राहील. २) उक्त पदावरील कर्मचाऱ्यांना कोवीड-१९ च्या अनुषंगाने महापालिका परिसरामध्ये शासनाचे निर्देशानुसार
नागरिकांच्या सर्व्हेक्षणाचे/ नियंत्रीत अधिकारी नेमुन देतील असे सर्व कामकाज करणे बंधनकारक राहिल. ३) प्रस्तुत मानधनावर करावयाच्या नेमणुका पुर्णता तात्पुरत्या / हंगामी स्वरुपाच्या आहेत. त्यामुळे अर्जदारास मनपामधील कोणत्याही पदावर कायमस्वरुपी नेमणुकीचा हक्क सांगता येणार नाही याबाबत विहित नमुन्यात हमीपत्र लिहून द्यावे लागेल.
४) ज्या दिवशी मनपास सदर पदांची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटीसीशिवाय मानधनावरील सेवा संपुष्टात आणण्यात येईल. ५) निवड केलेल्या उमेदवारांना महापालिकेने ठरवून दिलेल्या अटि-शर्तीनुसार कामकाज करणे बंधनकारक
राहिल, तसेच महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तीनही शिष्ट मध्ये कामकाज करावे लागेल.
६) सदर उमेदवारांना महापालिकेच्या वैद्यकिय विभागाअंतर्गत असणाऱ्या रुग्णालय / दवाखान्यामध्ये / कोवीड केअर सेंटरमध्ये कामकाज करावे लागेल तथापि नेमुन दिलेल्या रुग्णालय/ दवाखान्यामध्ये आवश्यकता नसलेस अन्य रुग्णालयामध्ये नियुक्ती देण्यात येईल.
७) सदरच्या नेमणुका कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचे सर्व अधिकार महापालिका आयुक्त यांनी राखून ठेवलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा