---Advertisement---

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तृतीयपंथी उमेदवारांकरिता शारीरिक चाचणीची मानके व गुण निश्चित

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीकरिता तृतीयपंथी उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीची मानके व गुण निश्चित करण्यात आली आहेत.

‘स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता’ आणि ‘स्वतःची लिंग ओळख महिला/तृतीयपंथी अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता’ शारीरिक चाचणीची मानके व गुण आयोगामार्फत खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत.

---Advertisement---

शारीरिक चाचणीचा तपशील
स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता
१) गोळा फेक- वजन- ७.२६० कि.ग्रॅ. कमाल गुण-१५
२) पुलअप्स- कमाल गुण-२०
३) लांब उडी- कमाल गुण-१५
४) धावणे (८०० मीटर)- कमाल गुण-५०

स्वतःची लिंग ओळख महिला/तृतीयपंथी अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता
१) गोळा फेक- वजन- ४ कि.ग्रॅ.- कमाल गुण-२०
२) धावणे (४०० मीटर) – कमाल गुण-५०
३) लांब उडी- कमाल गुण-३०

सन-२०२२ च्या परीक्षेकरिताः
शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्यात आले असून, शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ६० टक्के गुण (म्हणजे ६० गुण) मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता/अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही.

सन-२०२३ च्या परीक्षेकरिताः
शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्यात आले असून, शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ७० टक्के गुण (म्हणजे ७० गुण) मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता/अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही. तृतीयपंथी उमेदवारास त्यांची पुरुष, महिला किंवा तृतीयपंथी अशी स्वतःची लिंग ओळख निश्चित करणे आवश्यक राहील व यासंदर्भात विहित सक्षम प्राधिका-याने दिलेले विहित नमुन्यातील प्रमाणपत्र शारीरिक चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. सदर माहिती आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now