⁠
Inspirational

तुझ्या जिद्दीला सलाम..! शेतकऱ्याच्या लेकीने मुलींमध्ये पटकावला राज्यात प्रथम क्रमांक

MPSC Success Story : कोणतेही परीक्षा म्हटले की यश-अपयश आणि संयम याची अनोखी परीक्षा असते. तसेच शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या पूजाला आपण अधिकारी होऊ शकतो असा विश्वास आधीपासूनच होता.पण सातत्याने पदरात अपयश येत होते. यात तिच्या दोन्ही कुटुंबांनी खूप पाठिंबा दिला. त्यामुळेच, एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यात मुलींमध्ये पिंपरी- चिंचवडची पूजा वंजारी अव्वल ठरली आहे.

पूजा वंजारी ही मूळची सांगली जिल्ह्यातील आहे. लग्नानंतर ती पिंपरी चिंचवड येथे राहण्यासाठी आली. तिचे अभियांत्रिकी शिक्षण झाले असून २०१४ मध्ये शिक्षण घेत असतानाच तिने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. २०१५ आणि २०१६ या दोन्ही प्रयत्नात पूर्वपरीक्षेत अपयश आले. त्यानंतर २०१७ मध्ये पूजाने मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली. मात्र तिला यश मिळालं नाही. पुन्हा, २०१८ मध्ये पूजाला पूर्वपरीक्षेत अपयश आलं. निकाल पाहिल्यानंतर तासाभरातच तिने अभ्यासाला सुरुवात केली होती. २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेत पुजाला १३ गुण कमी पडले. पुन्हा तिची संधी हुकली.अखेर, ती या निकालात यश संपादन करू शकली.

या सगळ्यात महत्त्वाचा असतो तो पाठिंबा. एवढ्या वेळात अपयश आल्यावर नैराश्य येते, पुन्हा काही करू वाटतं नाही.प तर पूजाने जिद्दीने अभ्यास चालू ठेवला. ती दररोज सुमारे आठ तास अभ्यास करायची. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक असते. पूजाला तिच्या पतीचा पाठिंबा मिळाला. एक वेळ स्वयंपाक राहू दे मात्र अभ्यास कर, असं तिच्या पतीने ठणकावून तिला सांगितलं. स्पर्धा परीक्षेसाठी पती खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. त्यामुळेच, संसार आणि अभ्यास अशी कसरत करून तिने हे यश संपादन केल्याने तिचे विशेष कौतुक होत आहे.९०० पैकी ५७०.२५ गुण मिळवत पूजा राज्यात मुलींमध्ये अव्वल आली आहे. तो खऱ्या अर्थाने एमपीएसीचे स्वप्न साकार झाले आहे आणि तिने सत्यात उतरवले आहे.

Related Articles

Back to top button