14 November-
जमिनीवरून शक्तीशाली मारा करणाऱया पृथ्वी-२ या आण्विक क्षेपणास्त्राची शुक्रवारी चंडीपूर येथे लष्कराकडून यशस्वी चाचणी घेण्यात आली.
तब्बल ३५० किमीचा पल्ला असलेले पृथ्वी-२ हे स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे. पृथ्वी-२ या क्षेपणास्त्राची सुमारे ५०० ते १००० किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे. भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) जगप्रसिद्ध क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेले पृथ्वी हे पहिले क्षेपणास्त्र आहे. लष्कराच्या नियमित सरावांतर्गत ही चाचणी घेण्यात आली. भारताच्या सुसज्ज संरक्षणाच्या भक्कमतेवर या यशस्वी चाचणीने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.