---Advertisement---

PSI STI ASST 2018 – Previous Question Paper Analysis

By Rajat Bhole

Updated On:

PSI-STI-ASST-2018---Previous-Question-Paper-Analysis
---Advertisement---

नमस्कार,

हा लेख फार संक्षिप्त असेल. यात केवळ – आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आणि विश्लेषण यावर लिहित आहे. सोबत माझ्या स्वतःचा विषयानुसार Analysis केलेला Snapshot तुमच्या सोबत शेयर करत आहे. तत्पूर्वी तुम्ही या आधीचा मुख्य लेख वाचला नसल्यास, कृपया तो वाचावा त्यावरून पुढील विषयाचा आशय समजण्यास अधिक मदत होईल. – Mission PSI STI ASO 2018

---Advertisement---

हा Topic आपण प्रश्नउत्तरांच्या स्वरुपात Discuss करू…

१. आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका का सोडवाव्यात किंवा त्यांचे विश्लेषण का करावे…?

– या Activity द्वारे लक्षात येईल –

अ. प्रश्नांची काठीण्यपातळी

ब. विषयांरूप प्रश्नांचे स्वरूप

क. कोणत्या विषयाला किती व

ड. विषयांरूप कोणत्या SubTopic वर किती Focus असतो.

इ. आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा बदलता Trend.

२. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आणि विश्लेषण कधी करावे…? आणि का…?

– Ideally तुम्ही परीक्षेचा अभ्यास सुरु करण्याआधी प्रश्नपत्रिका सोडवून बघितल्या की अभ्यास करताना परीक्षेसाठी काय महत्वाचे आहे आणि काय नाही याची पडताळणी तुम्ही स्वतः करू शकतात.

३. ही Activity कोणी करावी..? फक्त नवीन अभ्यास सुरु करणार्यांसाठी ही Activity उपयोगी ठरेल का…?

– प्रत्येकवेळी परीक्षेचा अभ्यास सुरु करताना ही संपूर्ण Activity केल्यास फायदा होऊ शकेल. आणि प्रथमच MPSC चा  अभ्यास सुरु करणाऱ्यांसाठी This Is Must.

४. मार्केट मध्ये अनेक प्रश्नपत्रिकांच विश्लेषण असलेले पुस्तके उपलब्ध आहेत. मग आपण परत हे सर्व का करावे..?

– स्वतः केलेले विश्लेषण अभ्यास करताना चांगले लक्षात राहील, काही वेळा पुस्तकांमधून आपण Seriously ही Activity करत नाही. (अर्थात मी कोणत्याही पुस्तकांच्या विरोधात नाही.) मुळात उद्देश हा प्रश्नपत्रिका सोडवण्याचा किंवा किती Score येईल हे तपासणे हा नाहीच.

५. नेमकी ही Activity – मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आणि विश्लेषण कसे करावे.

– स्टेप Wise –
अ. मागील वर्षांच्या पूर्व च्या प्रश्नपत्रिका प्रिंट करून घ्या साधारण पाच. तुम्हाला प्रश्नपत्रिका इथे उपलब्ध होतील.

Previous Year Question Papers Of PSI STI ASO )

ब. पहिल्यांदा सोडवताना प्रश्न क्रमाने वाचा पर्याय वाचा आणि उत्तर tick करण्याचा प्रत्यन करा. उत्तर नसेलही येत तरी हे continue करा. एक प्रश्नपत्रिका पूर्ण होईल तोपर्यंत. (पुन्हा एकदा सांगेल आपला  उद्देश हा प्रश्नपत्रिका सोडवण्याचा किंवा किती Score येईल हे तपासणे हा नाही.)

क. दुसऱ्यांदा तीच प्रश्नपत्रिका पुन्हा सुरु करा आणि या वेळी कोणता प्रश्न कोणत्या विषयाचा आहे हे नोट करा.
उदा. प्रश्न १ इतिहासाचा असल्यास समोर H लिहू शकता (H-History) या प्रमाणे.

ड. तुम्ही syllabus चा आणि विषयांचा Subtopic wise अभ्यास केला असल्यास तुम्हाला यात Subtopics identify करता येतील. ( Syllabus )

इ. या सर्व Process नंतर तुम्ही Tabular फोर्म मध्ये तुमचे विश्लेषण लिहू शकतात. या द्वारे पुढच्या वेळी अभ्यास करताना तुम्हाला याचा फायदा होईल.

शेवटी मी माझ्या स्वतःचा विषयानुसार Analysis केलेला Snapshot तुमच्या सोबत शेयर करत आहे.

1481367229021

वरील फोटोत – विषय आणि त्यावरील अपेक्षित प्रश्नसंख्या. मागील काही प्रश्नपत्रीकेंच्या Analysis वरून दिल्या आहेत त्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या ठरतील. (ही प्रश्नसंख्या दर वर्षी बदलते मात्र यावरून ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे – Syllabus मधील प्रत्येक विषयावर कमी-अधिक प्रमाणात प्रश्न हे विचारलेच जातात.)

संपूर्ण प्रक्रियेत तुम्ही ५०० प्रश्नांचा सखोल अभ्यास करणार आहात पर्यायांसकट, त्यामुळे तुमचा एक प्रकारे अभ्यास सुरूच झालाय असे समजावे. शेवटी या बाबी Smart Study करतांना (कमी वेळात जास्त अभ्यास करताना) (तुमच्या वेळेचा Input- आणि तुम्हाला मिळणारे Result OutPut प्रमाणात असावे याकरता) आणि आपला Score वाढवण्यासाठी उपयोगात येणार आहे.

Stay Tune with this Page.

I Hope this will help you in Your Journey.
सोबतच आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट्स करून नक्की कळवाव्यात.

नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

[amazon_link asins=’B073SSDJ7L,B06XJM617R,B01N23CQWG,8193232003,B076HMTBKY,B0733C8519,B0728GQGVG,B072562K37,B072VL77R8′ template=’ProductCarousel’ store=’mimp-21′ marketplace=’IN’ link_id=’53c49984-1bd4-11e8-bb02-21c1b6fc0d10′]

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

6 thoughts on “PSI STI ASST 2018 – Previous Question Paper Analysis”

  1. खात्या्ंतर्गत पोलीस उपनिरीक्षक २०१७ या आगामी परिक्षे साठी अभ्यास क्रमावर योग्य पुस्तके कोणती वापरावित यासाठी मार्गदर्शन करा

Comments are closed.