PSI Success Story : लहानपणापासून आपल्या वाट्याला आलेली परिस्थिती तशीच राहत नाही तर ती कधी ना कधी बदलते. या परिस्थितीला कष्टाची जोड देणे आवश्यक आहे. अशीच परिस्थिती गौरव शिंदे याची होती. गौरव शिंदे हा पाटण तालुक्यातील गारवडे गावचा रहिवासी.
गौरवचे वडील सुभाष शिंदे हे सेंट्रींगचे काम करतात. वडीलार्जित तुटपुंज्या शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे अशक्य होते. त्यामुळे त्यांनी सेंट्रींगच्या कामावर जायला सुरूवात केली. पत्नी आणि दोन मुले, अशा चौघांच्या कुटुंबाचा चरितार्थ सेंट्रींग कामातून मिळणाऱ्या मजुरीवर चालवला.
आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी चांगले शिक्षण दिले. त्यांच्या वडिलांनी संपूर्ण शिक्षणाचाही भार पेलला. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर आता स्पर्धा परीक्षांची तयारी करायला हवी. तो म्हणून पुढे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी कराडमध्ये राहत होता. पुढे जोमाने स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला. यात त्याला चारवेळा यशाने हुलकावणी दिली. परंतू, पाचव्या प्रयत्नात त्याला यश मिळाले. या यशामध्ये त्याच्या वडीलांच्या कष्टाचा मोठा वाटा आहे. गौरव हा पहिल्यापासूनच मेहनती आणि हुशार होता. त्याने बी. ए ह्या पदवीनंतर नंतर त्याने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरूवात केली. अवघ्या काही वर्षांत २०१९ मध्ये त्याने पोलिस उपनिरीक्षक पदासाठीचे सर्व टप्पे यशस्वीपणे पूर्ण केले.
मित्रांनो, आपल्या शिक्षण आणि मेहनतीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.यशाची शिडी चढायची असेल तर या दोन्ही गोष्टीवर भर देणे गरजेचे आहे.