अभिमानाची गोष्ट! सायकल रिपेअर करणाऱ्या लेकीची PSI पदी गवसणी! वाचा तिच्या यशाची कहाणी..

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

PSI Success Story बिकट परिस्थितीवर मात करत केवळ मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर लावण्या जक्कन या तरुणीने PSI पदाला गवसणी घातली आहे. एवढंच नाही तर लावण्या जक्कन ही त्यांच्या कुटुंबात ग्रॅज्युएट होणारी पहिली मुलगी आहे.

लावण्या ही अहमदनगर शहरातील तोफखाना परिसरात राहते. तिचे वडील मागील ३० वर्षांपासून सायकल रिपेअरिंगचे काम करत होते. मात्र काही काळापूर्वी त्यांचा अपघात झाल्यामुळे ते आता गोळ्या बिस्कीटांची टपरी चालवतात. तिचे प्राथमिक शिक्षण सीताराम सारडा विद्यालयात झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण न्यू आर्टस् अँड कॉमर्स महाविद्यालायात झाले.

ती महाविद्यालयात असताना नगर शहरातील आपल्या अवतीभवती अनेक मुली ती पोलीस दलात पाहत होती.
तिने तेव्हा ध्येय व चिकाटी निश्चित केली. आपल्याला पण खाकी वर्दी मिळायला पाहिजे, आपण स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला पाहिजे म्हणून तिने स्पर्धा- परीक्षांचा अभ्यास सुरु केला.

लावण्या च्या शिक्षणात तिच्या आजी आजोबांचा सिंहाचा वाटा असल्याचं ती आवर्जून सांगते. तिच्या आजीचे बिड्या बनवण्याचं काम करून तिच्या शिक्षणाला हातभार लावला. आजोबांनी नेहमी प्रोत्साहन दिलं. कुटुंबात एकच मुलगी शिकलेली होती ती म्हणजे लहान होत्या. त्यांचं नेहमी मार्गदर्शन लावण्याला लाभलं. एकत्र कुटुंब असल्यामुळे वडापावची गाडी चालवून लावण्याचे चुलते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.

घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असली तरी तिने हार न मानता जिवाचे रान करून अभ्यास केला. ती रोज १४ ते १५ तास अभ्यास करत होती. घरातली थोडफार काम आवरून ती अभ्यासाला बसायची. यात तिने यूट्यूबची मदत घेतली. यामुळेच, ती पहिल्याच प्रयत्नात ती पोलिस उपनिरीक्षक झाली.

Share This Article