⁠  ⁠

सायकलपटू प्रियंकाचे वर्दी मिळवायचे स्वप्न झाले साकार! वाचा तिच्या यशाची कहाणी..

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

PSI Success Story शिवछत्रपती पुरस्कार विजेती सांगलीतील बामणोलीची ही कन्या. मूळात प्रियांका ही सायकलपटू असून आता तिला वर्दी मिळवायचं तिचं एक स्वप्न पूर्ण झालंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रियांकाने जिद्दीने पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले आहे.

लहानपणी तिच्या घरची परिस्थिती बेताची होती. मात्र, सायकलिंगच्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी सायकल घ्यायला पैसे पण नव्हते? चांगल्या स्पर्धेत भाग घ्यायचा तर चांगली सायकल हवीच. पैसेच पुरेसे नसल्याने तिच्या आईने मंगळसूत्र गहाणवट ठेऊन कर्ज काढण्याची वेळ आली. वडीलांनी कर्ज काढले व सायकल स्पर्धेसाठी दोन लाखाची सायकल घेतली. त्याच सायकलने महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळवून दिला आहे.

प्रियांकाची जडणघडण सामान्य घरातून झाली. तिचे वडील माजी सौनिक आहेत तर आई गृहणी आहे. आई, वडिलांनी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उच्च शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. तिने बामणोलीमध्येच राहून शालेय शिक्षण पूर्ण केले तर मिरज मध्ये उर्वरित शिक्षण पूर्ण केले.

बामणोली या छोट्याशा खेडेगावातून प्रियांका असली तरी खेळाविषयीचे आकर्षण स्वस्त बसून देतं नव्हतं. ती दररोज सायकलींग करायची तर पोलिस उपनिरीक्षक पदासाठी मैदानी सराव करायची. यामुळेच ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सायकलपटू आहे. इतकेच नाहीतर तिची खाकी वर्दी मिळवण्याची महत्त्वाकांक्षा होती. त्यासाठी तिनं पोलीस भरती परीक्षेतही प्रयत्न केला. या प्रयत्नांच्या जोरावर ती प्रियांका पीएसआय झाली. सामान्य घरातील मुलगी पीएसआय होते ही साऱ्या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

Share This Article