PSI Success Story शेतकरी पुत्र आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेले नाहीत. रामहरी यांनी देखील सर्वप्रथम हवालदार बनून आणि त्यानंतर पीएसआय पदी गवसणी घेतली आहे. दरवर्षी या परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात तर काहीच आपले नशीब आजमावत असतात. त्यापैकी एक रामहरी अण्णासाहेब खेडकर.
रामहरी हे मूळचे पाथर्डी तालुक्याच्या मौजे मालेवाडी येथील रहिवासी आहेत. शेतकरी कुटुंबातून येणारे रामहरी यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फौजदार बनण्याचं आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे.
रामहरी यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यांनी शिक्षणाची आवड असलेल्या रामहरी यांनी सलग सहा वर्ष पोलीस प्रशासनात हवालदार म्हणून सेवा बजावली आहे. शेवगाव पोलीस ठाण्यात त्यांनी हवालदार म्हणून काम पाहिले आहे. पण इथपर्यंत राहून चालणार नाही तर अजून चांगले पद मिळायला हवे. यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पोलीस खात्यात काम करताना एमपीएससीची देखील तयारी केली. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासादरम्यान त्यांनी अनेक चढ-उतार पाहिलेत. मात्र शेवटी त्यांनी पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात खरं उतरल आहे. हवालदार म्हणून सेवा बजावत असताना रामहरी यांनी अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने एमपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला आणि एमपीएससीची पीएसआय पदाची परीक्षा पास करत शेवटी पीएसआय पदाला गवसणी घातली.
यामुळे, रामहरी अण्णासाहेब खेडकर त्यांनी देखील फौजदार बनवून आपल्या गावाचं नाव रोशन केलं आहे.
मित्रांनो, मेहनत करायची तयारी असेल तर नोकरी करताना देखील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास होतो. फक्त नियमित वाचन, अभ्यास आणि वेळेचे व्यवस्थापन हवे. ते एकदा नीटपणे साधले की यश नक्कीच मिळते.